महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अश्विनी-तनिशा मानांकनात 28 व्या स्थानी

06:17 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

विश्व बॅटमिंटन फेडरेशनतर्फे घोषित करण्यात आलेल्या बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकन यादीत महिला दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिशा क्रेस्टो यांनी 28 व्या स्थानावर झेप घेतली आहे. अश्विनी आणि तनिशा यांचे मानांकनातील स्थान चार अंकांनी वधारले आहे.

Advertisement

नुकत्याच झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 दर्जाच्या लखनौतील बॅडमिंटन स्पर्धेत 36 वर्षीय अश्विनी आणि 20 वर्षीय तनिशा यांनी महिला दुहेरीत उपविजेतेपद मिळविले होते. तत्पूर्वी या जोडीने नेट्स आंतरराष्ट्रीय चॅलेंज तसेच अबु धाबी मास्टर्स सुपर 100 स्पर्धा जिंकली होती. पुरूष एकेरीच्या मानांकन यादीत भारताच्या प्रियांशु राजवतने पहिल्या 30 बॅडमिंटनपटूंमध्ये स्थान मिळविले आहे. एचएस. प्रणॉय 8 व्या, लक्ष्य सेन 17 व्या, किदांबी श्रीकांत 24 व्या, महिला विभागात पीव्ही. सिंधू 12 व्या तर पुरूष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी 2 रे स्थान मिळविले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article