महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बुमराहच्या कामगिरीचे अश्विनकडून कौतुक

06:02 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

इंग्लंड विरुद्ध नुकत्याच झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहच्या कामगिरीचे फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने खास कौतुक केले आहे. बुमराहची कामगिरी म्हणजे ‘बुमबॉल’ असल्याचे अश्विनने म्हटले आहे.

Advertisement

या दुसऱ्या कसोटीत बुमराहची गोलंदाजी इंग्लंडच्या फलंदाजांना खेळताना खूपच अवघड गेली. इंग्लंडच्या पहिल्या डावात बुमराहचे रिव्हर्स स्विंग अप्रतिम होते. बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात 45 धावात 6 गडी बाद केले तर दुसऱ्या डावात त्याने 3 गडी बाद करत या सामन्यात एकूण 91 धावात 9 गडी बाद करण्याचा पराक्रम केला. बुमराहची ही कामगिरी हिमालयाच्या उत्तुंग शिखरासारखी झाली. या कामगिरीमुळे बुमराह कसोटी क्रिकेटच्या गोलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर आरुढ झाला. अशी कामगिरी करणारा बुमराह हा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज आहे. बुमराहने वनडे आणि टी-20 प्रकारात यापूर्वी गोलंदाजांच्या मानांकन यादीत अग्रस्थान मिळविले. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात बुमराह 14 बळींसह पहिल्या स्थानावर आहे. आता या मालिकेतील तीन सामने बाकी राहिले असून हे सामने अनुक्रमे राजकोट, रांची आणि धर्मशाला येथे खेळविले जाणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article