आशुतोष फायबरचा समभाग 52 टक्के प्रिमीयमसह सुचीबद्ध
वृत्तसंस्था, मुंबई
आशुतोष फायबर या कंपनीचा समभाग शेअरबाजारात 52 टक्के प्रिमीयमसोबत सुचीबद्ध झाला आहे. प्रत्येक लॉटमागे गुंतवणूकदारांना 1,10,000 रुपयांचा नफा प्राप्त झाला आहे.
आशुतोष फायबरचा आयपीओ 144 पट इतका सबस्क्राइब झाला होता. याआयपीओअंतर्गत फक्त नवे समभाग सादर करण्यात आले आहेत. टेक्नीकल टेक्स्टाइल उत्पादने बनवणारी ही कंपनी असून एनएसई एसएमईवर कंपनीची दमदार सुरुवात झाली आहे. आयपीओत 92 रुपयांच्या भावावर समभाग जारी केले होते. सोमवारी कंपनीचा समभाग 140 रुपयांवर सुचीबद्ध झाला होता. म्हणजेच गुंतवणूकदारांना सुचीबद्धतेनंतर 52 टक्के इतका नफा पदरात पाडून घेता आला आहे. नंतर कंपनीचा समभाग इंट्रा डे दरम्यान 147 रुपयांवरही पोहचला होता, म्हणजेच गुंतवणूकदारांना 59 टक्के इतका परतावा मिळाला.
1 लाख 10 हजाराचा लाभ
ज्यांच्याकडे 1200 समभागांचा लॉट होता त्यांना 1.10 लाख रुपयांचा लाभ झाला आहे. 56 कोटी रुपयांचा हा आयपीओ असून यातील 25.51 कोटी रुपये नवी साधनसामग्री खरेदी करण्यासाठी तसेच 20 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी तर उर्वरीत रक्कम इतर कारणांसाठी खर्च केली जाणार असल्याचे कंपनीने शेअरबाजाराला सांगितले आहे.