अशोक लेलँडला 770 कोटी रुपयांचा नफा
सप्टेंबर तिमाहीतील कामगिरी : 9588 कोटीचा महसूल
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ट्रक आणि बस निर्माती कंपनी अशोक लेलँड यांनी आर्थिक वर्ष 2026 च्या सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला असून दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 771 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 770 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. याव्यतिरिक्त सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत 9 टक्के वाढीसह कंपनीने 9588 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधी समान अवधीत 8769 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीने वाहन विक्रीत 8 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. दुसरीकडे निर्यातीमध्ये पाहता कंपनीने 45 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. याच दरम्यान कंपनीने गुंतवणूकदारांना अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली असून प्रत्येक समभागावर एक रुपयांचा लाभांश दिला जाणार आहे.
समभागाची कामगिरी
बुधवारी अशोक लेलँड कंपनीचा समभाग दुपारी दोन वाजून 48 मिनिटांनी 2.14 टक्के घसरणीसह 142 रुपयांवर व्यवहार करत होता. अशोक लेलँडचे बाजार भांडवल मूल्य 50711 कोटी रुपयांवर पोहोचले असून कंपनीच्या समभागाची कामगिरी पाहता गेल्या एक महिन्यामध्ये 2 टक्के परतावा आणि 3 महिन्यांमध्ये 21 टक्के इतका परतावा दिलेला आहे.