अशोक लेलँडला 1200 कोटींची गुंतवणूक करण्यास मान्यता
ईव्ही कंपनी स्विच मोबिलिटीमध्ये होणार गुंतवणूक : कार्यकारी मंडळाकडून हिरवा कंदील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्यावसायिक वाहन निर्मिती कंपनी अशोक लेलँडला 1200 कोटी रुपयांच्या गुंतवणूक योजनेला संचालक मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. अशोक लेलँडचे कार्यकारी अध्यक्ष धीरज हिंदुजा यांनी सांगितले की, बोर्डाने त्यांची होल्डिंग कंपनी ऑपटेल पीएलसी युके मार्फत इक्विटीच्या स्वरूपात स्विच मोबिलिटीमध्ये 1,200 कोटी रुपये गुंतवणुकीस मान्यता दिली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम भांडवली खर्च, कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन युनिटचे संशोधन आणि विकास तसेच भारत आणि ब्रिटनमधील व्यवसायाशी संबंधित खर्च भागवण्यासाठी वापरली जाईल. ही रक्कम कंपनी टप्प्याटप्प्याने वापरणार आहे. आणखी काही आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर ही गुंतवणूक योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सीव्ही हेड, स्विच ग्रुप ऑफ कंपनीचे अशोक (स्विच मोबिलिटी लिमिटेड - यूके आणि स्विच मोबिलिटी ऑटोमोटिव्ह लिमिटेड-भारत) लेलँडचा इलेक्ट्रिक मोबिलिटी उपक्रम आहे, जो ई-बस आणि ई-एलसीव्हीवर लक्ष केंद्रित करतो.
गेल्या काही वर्षांत, स्विच इंडियाला राज्य परिवहन उपक्रमांकडून ऑर्डर मिळवण्यात मोठे यश मिळाले आहे. आजपर्यंत, स्विचच्या भारत आणि यूकेमध्ये 1,200 पेक्षा जास्त बसेसच्या ऑर्डर बुकसह 800 हून अधिक बस यशस्वीपणे धावत आहेत.
भारतातील एकमेव डबल-डेकर ई-बसचे लाँचिंग
सप्टेंबर 2023 मध्ये, स्विच इंडियाने त्याचे अत्याधुनिक e- LCV लाँच केले. कंपनीने तिच्या बहुप्रतिक्षित ई-एलसीव्हीसाठी 13,000 हून अधिक वाहनांसाठी सामंजस्य करार केले आहेत, ज्याची डिलिव्हरी चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे.