अशोक हलगेकर यांची अध्यक्षपदी निवड
कार्याध्यक्षपदी गुलाब जंगू शेख निवड
बेळगाव : कै. चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीच्या वतीने 16 फेब्रुवारी रोजी बेळगाव मध्ये कुस्ती मैदान भरविण्यात येणार असुन अध्यक्षपदी अशोक हलगेकर, कार्याध्यक्षपदी गुलाब जंगू शेख यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अशोक हलगेकर यांचे अध्यक्षपदी तसेच कार्याध्यक्ष म्हणून श्री गुलाब जगू शेख यांची निवड करण्यात आली. मल्लविद्या जिवंत ठेवण्यासाठी व कुस्तीची परंपरा अबाधित राखण्यासाठी हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीच्या वतीने गेले पंचवीस वर्षे कुस्ती दंगल भरून बेळगावच्या कुस्ती चे मोठेपण जपले आहे. बैठकीला शंकर मुचंडी, प्रभाकर हलगेकर, आनंद जाधव, अनिल चौगुले, सुनील हुक्केरीकर, गजानन घोरपडे, मधुकर वेर्लेकर, नितीन चौगुले, ईश्वर पाटील, सदानंद हलगेकर आदी सभासद उपस्थित होते. ज्यांना कुणाला या दंगलीमध्ये कुस्ती करायचे आहे त्यानीं अशोक हलगेकर व सदानंद हलगेकर यांच्याशी संपर्क साधावा. असे अव्हाहन करण्यात आले आहे.