‘किसको था पता’मध्ये अशनूर
युवा अभिनेत्री अशनूर कौरचा आगामी चित्रपट ‘किसको था पता’चा ट्रेलर सदार करण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे अशनूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अक्षय ओबेरॉय आणि आदिल खान देखील मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रत्ना सिन्हा यांनी केले असून त्यांनीच निर्मितीची जबाबदारी पेलली आहे. याची कहाणी दीर्घ काळापासून माझ्या मनात होती, ही कहाणी आता चित्रपटाच्या स्वरुपात लोकांसमोर आणत आहे असे रत्ना सिन्हा यांनी म्हटले आहे. मी कधीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. दिल्लीतून मुंबईत आल्यावर एवढा मोठा पल्ला गाठता येईल याचा विचारही मी केला नव्हता असे अशनूरने सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी अशनूरने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. यात तिच्या भूमिकेची झलक दिसून आली होती. टीव्ही शोंमधील स्वत:च्या अभिनयासाठी ओळखली जाणारी अशनूर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.