आशिष महाले यांची महिंद्र एरोस्पेस कंपनीत नियुक्ती
07:38 PM Apr 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
Advertisement
वेंगुर्ले येथील मूळ रहिवासी आणि महिंद्रा अँड महिंद्रा या सुप्रसिद्ध भारतीय ऑटोमोबाईल कंपनीचे महाव्यवस्थापक आशिष महाले यांची बंगलोर येथील महिंद्र एरोस्पेस कंपनीचे प्लांट हेड म्हणून नियुक्ती झाली. आशिष यांचे शालेय शिक्षण वेंगुर्लेत तर अभियांत्रिकी शिक्षण सांगली येथे झाले. वेंगुर्लेतील जुने व्यापारी व जेष्ठ समाजवादी कार्यकर्ते श्री पंढरीनाथ महाले यांचे मुलगे तर बांदा येथील गोगटे वाळके कॉलेजचे प्राध्यापक डॉ अभिजीत महाले यांचे ते बंधू आहेत.आशिष यांनी एक्सेल संशोधन आधारित पेटंट मिळवली असून महिंद्र कंपनीच्या प्रगतीत भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत कंपनीने त्यांना तीन वेळा सन्मानित केले आहे. महिंद्र एअरो स्पेस ही उपकंपनी असून ती मोठ्या विमानांच्या सुट्या भागांचे बंगलोर येथे उत्पादन व निर्यात करते.
Advertisement
Advertisement