वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजीत आशी, अंजुम , सिफ्टकडून निराशा
वृत्तसंस्था/ कैरो
बुधवारी येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल 3-पोझिशन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला स्थान मिळू शकले नाही. आशी चौक्सी आणि ऑलिम्पियन अंजुम मुदगिल यांना पात्रता फेरीत अनुक्रमे 15 आणि 17 वे स्थान मिळाले. आशीने 588 तर अनुभवी अंजुमने 587 गुण मिळवले.
स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर असलेली ऑलिम्पिक सिफ्ट कौर सामरा 580 गुणांसह 48 व्या स्थानावर राहिली. पात्रता फेरीत 595 गुणांसह अव्वल स्थान मिळवणारी नॉर्वेची जीनेट हेग ड्युएस्टॅड आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत 465.8 गुणांसह विश्वविजेती ठरली. स्वित्झर्लंडची 17 वर्षीय एमेली जेगीने 465.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले. हा एक ज्युनियर विश्वविक्रम आहे. ग्रेट ब्रिटनची सेओनेड मॅकिन्टोशने कांस्यपदक जिंकले. भारताने तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह पदकतालिकेत चीननंतर दुसरे स्थान कायम ठेवले आहे, तर चीनकडे आठ सुवर्ण आणि एकूण 15 पदके आहेत. 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूलच्या अचूक टप्प्यात मनू भाकर, ईशा सिंग आणि राही सरनोबत गुरुवारी खेळतील