Ashadhi Wari 2025: पंढरपुरातील वारीसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या, प्रवासही होणार स्वस्त?
आगामी काळात रेल्वे सेवा अधिक कार्यक्षम आणि सुगम होणार आहे
कोल्हापूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-पंढरपूर विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे वारकऱ्यांना यात्रेसाठी मोठा फायदा होणार आहे. याशिवाय, लवकरच सकाळच्या वेळेत कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस गाडी सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव असल्याचे अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.
कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी लवकर सोडण्याचा निर्णयही प्रवाशांच्या सोयीचा विचार करून घेण्यात आला आहे. मुंबई येथे पार पडलेल्या मध्य रेल्वेच्या १२६ व्या क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यात्रेकरू आणि प्रवाशांना दिलासा देणारे विविध प्रस्ताव मान्य करण्यात आले असून यामुळे आगामी काळात रेल्वे सेवा अधिक कार्यक्षम आणि सुगम होणार आहे. मुंबई येथे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी काही निर्णय महत्वपूर्ण ठरले आहेत.
या सह्याद्री एक्सप्रेसचा प्रवास स्वस्त होणार कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेसचा विशेष दर्जा रद्द करून तिला सामान्य दरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदलामुळे सह्याद्रीचा प्रवास स्वस्त होणार आहे. सध्या विशेष रेल्वे म्हणून प्रवाशांना जवळपास दुप्पट तिकीट दर वसूल केला जात होता.
आता हा प्रवास प्रवाशांसाठी खर्चिक न होता सेवा उपलब्य व्हावी यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. याचवेळी सांगली-परळी एक्सप्रेस ही सध्या डेमू म्हणून धावते आहे, तिला ICF कोचमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीला मान्यता देण्यात आली आहे.
बैठकीत कोयना एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेस गाड्यांना गांधीनगर, रुकडी व ताकारी येथे थांबे देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस व हुबळी पुणे वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना कराड येथे थांबा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यावर लवकरच
अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
बैठकीस शिवनाथ बियाणी, किशोर भोरावत, गोपाळ तिवारी आणि गजाधर मानथना हे मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार सदस्य उपस्थित होते. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना अधिक चांगल्या आणि वेगवान रेल्वे सेवा मिळणार असून प्रशासन सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे दिसून आले.
सह्याद्री एक्स्प्रेसचा प्रवास स्वस्त होणार
कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेसचा विशेष दर्जा रद्द करून तिला सामान्य दरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदलामुळे सह्याद्रीचा प्रवास स्वस्त होणार आहे. सध्या विशेष रेल्वे म्हणून प्रवाशांना जवळपास दुप्पट तिकीट दर वसूल केला जात होता. आता हा प्रवास प्रवाशांसाठी खर्चिक न होता सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. याचवेळी सांगली-परळी एक्सप्रेस ही सध्या डेमू म्हणून धावते आहे, तिला घ्ण्इ कोचमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीला मान्यता देण्यात आली आहे.