For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य श्रीराम मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात

06:40 AM Jul 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्य श्रीराम मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव

शहापूर, गाडेमार्ग आचार्य गल्ली येथील पुरातन मंदिर लोकमान्य श्रीराम मंदिरात आषाढी एकादशीचे औचित्य साधून शंकरराव बांदकर यांचे प्रवचन झाले. तानाजी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Advertisement

गायिका कविता मोदगेकर, तबलावादक ओमकार लोहार, टाळकरी उमेश भाबल, शैलेश शिरोडकर यांचे बांदकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंदाताई मुचंडी तसेच वैष्णवी देसाई यांनी प्रभू श्री रामलल्लाची आणि सद्गुरुंची आरती केली. अर्चना जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

आशाताई गिनगिने यांनी सर्व भक्तांना प्रसाद देऊन एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सुधीर कालकुंद्रीकर यांनी परिश्रम घेतले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संचालक सुबोध गावडे यांनी एकादशीनिमित्त सर्व भक्तांचे स्वागत केले.

Advertisement
Tags :

.