आशा पत्रावळी यांना ‘भारतीय राष्ट्रगौरव 2026’ पुरस्कार
06:34 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
Advertisement
बेळगावच्या आशा पत्रावळी यांना विणकाम आणि महिला सबलीकरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘भारतीय राष्ट्रगौरव 2026’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्लोबल पीस कौन्सिल’ नवी दिल्लीतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. समाजाला प्रेरणा देणाऱ्या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.
आशा पत्रावळी यांनी विणकाम क्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग केले असून विणकाम विषयावर पुस्तके लिहिली आहेत. अनेक विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांना विणकाम शिकवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत केली आहे.
Advertisement
Advertisement