For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आशा भोसलेंची नात करणार पदार्पण

06:07 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
आशा भोसलेंची नात करणार पदार्पण

जनाईला मिळाला बॉलिवूडपट

Advertisement

चित्रपटसृष्टीत अनेक स्टार किड्स सध्या कार्यरत आहेत. या स्टारकिड्सने स्वत:च्या आईवडिलांच्या नावाचा वापर करत बॉलिवूडमध्ये स्वत:साठी संधी मिळविली आहे. आता या यादीत दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांची नात जनाईचे नाव जोडले जाणार आहे.

संदीप सिंह यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा चित्रपट ‘द प्राइड ऑफ भारत-छत्रपती शिवाजी महाराज’मध्ये जनाई भोसले दिसून येणार आहे. जनाई या चित्रपटात ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. जनाईला पदार्पण करण्याची संधी देता आल्याने अत्यंत आनंदी आहे. जनाई ही भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबाची सदस्य असल्याचे संदीप सिंह यांनी म्हटले आहे.

Advertisement

जनाई ही आशा भोसले यांच्याप्रमाणेच उत्तम गायिका आहे. तसेच नृत्यातही ती पारंगत आहे. तिची गुणवत्ता पाहूनच तिला चित्रपटातील महत्त्वाची भूमिका देण्यात आली असल्याचे संदीप सिंह यांनी सांगितले आहे. जनाई ही सौंदर्यात कुठल्याही अन्य अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. जनाईने यापूर्वी अनेक म्युझिक अल्बमसाठी गायन केले आहे.

Advertisement

Advertisement
×

.