For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रकृती बिघडल्याने आसाराम एम्समध्ये दाखल

06:41 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रकृती बिघडल्याने आसाराम एम्समध्ये दाखल
Advertisement

छातीत वेदना होत असल्याची तक्रार

Advertisement

वृत्तसंस्था/ जोधपूर

राजस्थानात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसाराम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आसाराम यांनी छातीत कळ येत असल्याची तक्रार केली होती. ज्यानंतर त्यांना गुरुवारी रात्री उशिरा जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या ते आयसीयूत असून त्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

Advertisement

अंतर्गत रक्तस्त्रावासोबत अन्य समस्यांकरता आसाराम यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. याचबरोबर त्यांच्या अनेक वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहेत. तर आसाराम यांच्या संस्थेकडून रुग्णालयाबाहेर लोकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 21 मार्च रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने आसाराम यांना जोधपूर येथी एका खासगी आयुर्वेदिक रुग्णालयात पोलिसांच्या सुरक्षेदरम्यान 10 दिवसांपर्यंत उपचार करविण्याची अनुमती दिली होती. तर आसाराम यांनी महाराष्ट्रातील खोपोली येथे उपचार करवून घेण्याची अनुमती   मागितली होती. परंतु महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव यासंबंधीची अनुमती नाकारली होती.

Advertisement
Tags :

.