महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आयडी’त सर्जन नसल्याने रुग्णांची परवड

10:11 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रुग्णांना जावे लागते गोमेकॉ किंवा खासगी इस्पितळात : खात्याकडे पत्रव्यवहार करुनही खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष

Advertisement

फोंडा : आरोग्य क्षेत्रात नंबर वन म्हणून मिरविणाऱ्या गोव्यात फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात (आयडी) गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून सर्जन डॉक्टर उपलब्ध नसल्याने ऊग्णांची परवड चालली आहे. एखाद्या गंभीर दुखण्यावर उपचार, सल्ला व गरज पडल्यास शस्त्रक्रिया करायची झाल्यास ऊग्णांना खासगी सर्जनकडे किंवा बांबोळी येथील गोमेकॉत जावे लागत आहे. सर्जन डॉक्टरची नियुक्ती होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. फोंडा हे राज्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने फोंडा शहरासह तालुक्यातील पंचवाडीपासून माशेलपर्यंत व मडकईपासून बेतोडा निरंकालपर्यंतचे ऊग्ण आयडी इस्पितळात उपचारासाठी येतात. याशिवाय धारबांदोडा तालुक्यातील कुळे, मोले, दाभाळ, साकोर्डा व अन्य आसपासच्या भागातील ऊग्णांसाठी आयडी हे जवळचे व सोयीस्कर सरकारी इस्पितळ आहे.

Advertisement

आठवड्याला दहा शस्त्रक्रिया

गेल्या मार्च महिन्यात आयडी इस्पितळातील सर्जनला सेवेतून निलंबित केल्यापासून ही जागा रिक्त आहे. अॅपेंडिक्स, हर्निया, अल्सर तसेच शरीरावर उठणाऱ्या गुटांवर उपचार करण्यासाठी सर्जन लागतो. आयडी इस्पितळात पूर्णवेळ सर्जन उपलब्ध असताना बाह्या ऊग्ण विभागात दिवसाकाठी शंभरहून अधिक ऊग्णांची तपासणी केली जायची. तसेच मंगळवार व शुक्रवार असे आठवड्यातील दोन दिवस सात ते आठ छोट्या तर चार ते पाच मोठ्या शस्त्रक्रिया व्हायच्या.

 ‘रोगापेक्षा इलाज महाग’

फोंडा तालुक्यासह आसपासच्या भागातील गरीब ऊग्णांसह सर्वांनाच आयडी हॉस्पिटल आर्थिकदृष्ट्या व प्रवासाच्यादृष्टीने सोयीस्कर होते. गेल्या नऊ महिन्यांपासून सर्जन उपलब्ध नसल्याने आयडी इस्पितळात उपचारांसाठी येणाऱ्या ऊग्णांना एकतर गोमेकॉत किंवा खासगी इस्पितळात मोठा खर्च करुन उपचार घेणे भाग आहे. त्यामुळे सर्वसामान्य ऊग्णांची स्थिती ‘रोगापेक्षा इलाज महाग’ अशीच झाली आहे.

 पत्रव्यवहार करुनही प्रतिसाद नाही

इस्पितळात येणाऱ्या ऊग्णांची गैरसोय तसेच वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन येथील प्रशासकीय विभागाकडून सर्जनसाठी आरोग्य खात्याकडे सातत्याने पत्रव्यवहार सुऊ आहे. पण वर्ष सरत आले तरी सर्जन काही उपलब्ध झालेला नाही. सध्या सर्जनच्या जागी मेडिकल ऑफिसरला ऊग्णांची तपासणी कऊन पुढील उपचारासाठी गोमेकॉत पाठवावे लागत आहे.

 रुग्ण, नातेवाईकांचा जीव येतो टांगणीला 

सध्यस्थितीत फोंडा व धारबांदोडा तालुक्याच्या ग्रामीण भागातील ऊग्णांना उपचारासाठी गोमेकॉमध्ये जायचे झाल्यास अंगावर दुखणे घेऊन पूर्ण दिवस खर्च करावा लागतो. त्यातही गोमेकॉत एका दिवसात काम होईल, याची शाश्वती नसते. बसमधून दोन ते तीन तास प्रवास केल्यानंतर गोमेकॉत पोहोचेपर्यंत ऊग्ण व त्यांच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागतो. आयडी इस्पितळात उपचार मिळत नसल्याने, नाईलाज म्हणून सध्या बऱ्याच ऊग्णांवर आजार गंभीर होईपर्यंत अंगावर काढण्याची वेळ आली आहे.

‘नंबर वन’च्या घोषणा अन् वास्तव...

आरोग्य क्षेत्रात अद्ययावत व नवनवीन सुविधा उपलब्ध केल्याच्या घोषणा राज्य सरकार करीत आहे. पण राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सरकारी इस्पितळात हजारो ऊग्णांची गरज असलेला एखादा सर्जन मिळू नये, हे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल. फोंडा उपजिल्हा इस्पितळाची सुसज्ज इमारत उभाऊन दहा वर्षे उलटली तरी तेथे अद्याप सीटीस्कॅन सारख्या सुविधा नाहीत. सध्या सर्जनची अनुपलब्धता हेच या इस्पितळाचे मोठे दुखणे बनून राहिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article