Supriya Sule : बारामतीत विठ्ठलदादा मणियार दिसताच सुप्रिया सुळे गळ्यात पडून रडल्या अन्...
अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू
मुंबई : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य पाचजण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की, अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या जाण्याने राज्यातील अनेक नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय.
अजित खासदार सुप्रिया सुळे खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीत होते. अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती मिळताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विमानानं पुण्यात दाखल आले. तिथून हेलिकॉप्टरनं हे सर्वजण बारामतीत दाखल झाले. बारामतीत दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळे या भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. बारामतीत विठ्ठलदादा मणियार यांना पाहताच सुप्रिया सुळे त्यांच्या गळ्यात पडून रडल्या.
सुप्रिया सुळे विठ्ठलदादा मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बारामतीत आले त्यावेळी तिथं त्यांचे नातेवाईक राणाजगतिसिंह पाटील तिथं उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे या विठ्ठलदादा मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचा उल्लेख तुमचा एकदम लाडला असा उल्लेख केला. यानंतर त्या मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. यानंतर सुनेत्रा पवार यांना देखील अश्रू थांबवता आले नाहीत.
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
अजित पवार यांचं पार्थिव आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवण्यात आलं आहे. अजित पवारांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते नेते बारामतीत दाखल होत आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
जी पोकळी तयार होते ती भरून काढणं अतिशय कठिण
“राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबत तीन दिवसाचा दिखवटा जाहीर करण्यात आला आहे. कधीही भरून न निघणारं असं नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं अतिशय कठिण आहे. अजितदादा गेले यावर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अजित पवार हे जनतेच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असायचे. लोकांमध्ये त्यांचा वावर असायचा.
अपघात कसा झाला?
विमानाच्या लँडिंग वेळी हा अपघात झालेला आहे. या अपघाताचे धक्कादायक व्हिडिओही आता समोर येत आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे.विमान कोसळल्यानंतर विमान जळाल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.