मजगाव येथे गाडेयात्रेनिमित्त इंगळ्या, आज ओटी भरण्याचा कार्यक्रम
12:11 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/मजगाव
Advertisement
मजगावची गाडेयात्रा रविवार दि. 5 पासून सुरू आहे. सोमवार दि. 6 रोजी सायंकाळी 6.30 वा. मंदिरासमोर इंगळ्याचा भव्यदिव्य कार्यक्रम ‘हर हर महादेव’च्या जयघोषात पार पडला. यावेळी मजगाव परिसरातील सुमारे 10 हजारहून अधिक भाविक उपस्थित होते. यावेळी देवस्थान पंच कमिटीचे सदस्य व उद्यमबाग पोलीस स्टेशनच्यावतीने कार्यक्रम नियोजनबद्धरित्या पार पडला. मंगळवार दि. 7 रोजी ग्रामदेवी महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सकाळपासून सुरू राहणार आहे व बुधवार दि. 8 रोजी गाडेयात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांचे भव्य कुस्ती मैदान होणार आहे.
Advertisement
Advertisement