कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन वर्षात तब्बल 1650 दुचाकींवर डल्ला

01:52 PM Jan 30, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / आशिष आडिवरेकर : 

Advertisement

झटपट चैनीसाठी पैसे कमावण्यासाठी सध्या दुचाकी चोरीचा ट्रेंड वाढला आहे. गेल्या दोन वर्षामध्ये चोरट्यांनी 1650 दुचाकींवर हात साफ केला असून, यापैकी केवळ 500 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरीत दुचाकींचा छडा लावण्यात पोलीसांना अपशय आले आहे. स्थानिक पोलिसांना तर दुचाकीचा तपास करण्यास वेळच नसल्याचे दिसत आहे.

Advertisement

शहरासह जिह्यात दिवसाकाठी 2 ते 3 दुचाकींची सरासरी चोरी झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस ठाण्याकडून याची केवळ नोंद करुन घेण्याचे काम सुरु असून, चोरीस गेलेल्या दुचाकींचा तपास होतो की नाही याचाच तपास करण्याची गरज आता आली आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून दुचाकी चोरीस गेलेल्या तक्रारदारांवरच प्रश्नांचा भडिमार करुन भंडावून सोडण्याचे काम केले जात आहे. वाहन मालकाकडेच उलट तपास करण्याचे काम काही पोलीस अंमलदार करत आहेत. तुम्हीच दुचाकी व्यवस्थीत लावली नसेल, हॅडल लॉक केले नसेल अशा प्रश्नांचा भडीमार तक्रारदारावर केला जात आहे. एकीकडे दुचाकी चोरीस गेल्याने हैराण झालेल्या नागरीकांवर पोलीसांच्या प्रश्नाची सरबत्ती होत आहे, यामुळे काहीवेळा तक्रारदार तक्रार न देणे पसंत करत आहेत.

काही विशेष दुचाकी चोरी करण्यावर चोरट्यांचा भर आहे. जुन्या असणाऱ्या स्प्लेंडर तसेच यामा आरएक्स100 या दुचाकी चोरण्यावर चोरट्यांचा अधिक भर आहे. या दुचाकींना बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे याला खरेदीदार अधिक मिळत आहेत. तसेच या दुचाकींचे काही भाग विकून पैसे मिळवणारी एक टोळीही जिह्यात कार्यरत आहे.

दुचाकी चोरीमध्ये तरुणांचा समावेश वाढत आहे. झटपट गाडीची चोरी करुन एकाकडे याच्या विक्रीची जबाबदारी देण्यात येते. यामध्ये अल्पवयीन चोरट्यांचाही जाणीवपुर्वक समावेश करण्यात येत आहे. जिह्यातील दुचाकींची कर्नाटकसह, गोव्यात विक्री झाल्याचेही उघड झाले आहे. यामुळे जिह्यातील दुचाकी चोरीमागे आंतरराज्य टोळीचाही सहभाग समोर आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने वर्षभरात 30 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये 200 हून अधिक दुचारी जप्त केल्या आहेत. यामध्ये 50 हून अधिक आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे. 2024 मध्ये हस्तगत केलेल्या 311 दुचाकीपैकी 200 दुचाकी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून जप्त करण्यात आले आहेत. मग स्थानिक पोलीस स्टेशन आणि त्यांचे गुन्हे शोध पथक काय काम करत आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

काही दुचाकी चोरट्यांची टोळी दुचाकीची चोरी करुन त्याचे स्पेअर पार्ट वेगवेगळे करत असल्याचे समोर आले आहे. शिये येथील एका विहीरीत 15 हून अधिक दुचाकी टाकण्यात आल्या होत्या. या दुचाकींचे मॅगविल आणि हँडल काढून घेण्यात आले होते. काही दुचाकींचे हँडल, काही दुचाकींचे सायलेंसर, तर काही दुचाकींचे मॅगविल चोरल्याचे समोर येत आहे.

पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दुचाकी आणि चारचाकी चोरीच्या गुह्यांचा छडा लावण्यासाठी विशेष पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक खास दुचाकी चोरट्यांवर लक्ष ठेवून असून प्रलंबीत गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहेत. जानेवारी 2025 या एकाच महिन्यात 38 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, 7 चारचाकी जप्त केल्या आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.

                                                                                               पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर

वर्ष                    दुचाकीची चोरी                      मिळालेल्या

2023                       750                                    196

2024                       900                                    311

                             1650                                    506

वर्ष                       चारचाकी                              मिळालेल्या 

2023                        15                                        9

2024                       12                                        6

                               27                                        15

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article