आर्यन खानचे दिमाख्यात पदार्पण
मुंबई
किंग खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शनातून इंडस्ट्रीमध्ये आपले पहिले पाऊल टाकत आहे. त्याच्या या शोचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. यामध्ये आर्यन खान हसताना दिसत आहे. त्.यला हसताना पाहून शाहरुखच्या फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आर्यन खानचा हा शो नेटफ्लिक्सवर येणार आहे. द बॅड्स ऑफ बॉलीवूड असे या शो चे नाव आहे.
आर्यन खान हा मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकला आहे. त्यानंतर तो पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेला. तिथे त्याने स्कूल ऑफ सिनेमॅटीक आर्ट येथून फाई आर्ट, सिनेमॅटीक आर्ट आणि टेलिव्हीजन प्रोडक्शन मध्ये बॅचलर डिग्री घेतली.
याशिवाय आर्यन खानने २०२३ मध्ये D'YAVOL X हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला आङे. या ब्रॅण्डचे प्रमोशन शाहरुख खान आणि सुहाना खान करत आहेत. शिवाय २०२४ मध्ये आर्यन खान ने दिल्लीमध्ये ३७ कोटी रुपयांची प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट रुपात घेतली आहे.