सावंतवाडीच्या आर्यनची राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत निवड
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी आर्यन दुधवडकर याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत निवड झाली आहे. सदर स्पर्धा ४ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२५ दरम्यान हरियाणा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी दिनांक २७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ वर्धा येथे होणाऱ्या सराव शिबिरासाठी तो रवाना झाला आहे.आर्यन दुधवडकर एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी मधून क्रिकेटचे धडे घेतले. त्याला अकादमीचे मुख्य प्रशिक्षक श्री राहुल रेगे, सहाय्यक प्रशिक्षक श्री अविनाश जाधव तसेच महाराष्ट्र १९ वर्षाखालील संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक श्री अजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. आर्यनचे पंचम खेमराज महाविद्यालयाचचे प्राचार्य व इतर शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच अकॅडमीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी ज्योती दुधवडकर यांचा आर्यन हा सुपुत्र होय .