आर्या दळवीची नवोदय विद्यालयासाठी निवड
वेंगुर्ले (वार्ताहर)-
जिल्हा परिषद शाळा होडावडे नं. ५ या शाळेची विद्यार्थिनी आर्या दळवी हिची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. शाळेच्या इतिहासात या शाळेतून पहिल्यांदाच विद्यार्थीनीची नवोदयसाठी निवड झाली. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचेही खास अभिनंदन होत आहे.होडावडे शाळा नं. ५ या शाळेतील आर्या यशवंत दळवी हिची नवोदय विद्यालय सांगेली मध्ये इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेद्वारे निवड झाली. त्याबद्दल आर्या दळवी व तिचे आई बाबा यांचे अभिनंदन सुध्दा करण्यात आले आहे आर्या हिला शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा राणे आणि शिक्षिका तन्वी बांदिवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थिनीचे, केंद्रप्रमुख विठ्ठल तुळसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी, तसेच सरपंच रसिका केळुस्कर, उपसरपंच राजबा सावंत यांनी अभिनंदन केले आहे.