For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी अरविंद मोंडकर यांची निवड

04:30 PM May 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी अरविंद मोंडकर यांची निवड
Advertisement

मालवण :

Advertisement

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने संघटन सृजन अभियानांतर्गत राज्यातील विविध जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अरविंद नामदेव मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे.निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अरविंद मोंडकर यांनी सांगितले, लोकशाही आणि संविधान अधिक मजबूत करण्यासाठी तसेच गांधी-नेहरू यांच्या विचारांना बळकटी देण्यासाठी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा जपत येणाऱ्या काळात अधिक जोमाने पक्ष संघटन वाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.