अरविंद केजरीवाल आज गोव्यात मोठी घोषणा करणार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
पणजी : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्याबाबत मोठ्या घोषणेचे संकेत दिले आहेत. “मी आज गोव्यात येत असून एक अतिशय मोठी घोषणा करणार आहे,” असे केजरीवाल यांनी म्हटल्याने गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
केजरीवाल यांच्या या वक्तव्यामुळे ते गोव्यात नेमकी कोणती घोषणा करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे.
गोव्यात आम आदमी पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय रणनीती याबाबतही या घोषणेत काही महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, केजरीवाल यांच्या घोषणेचा नेमका विषय काय असेल, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
केजरीवाल यांच्या गोवा दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, त्यांच्या घोषणेनंतर त्याचे पडसाद आगामी राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.