महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

07:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आज तिहार कारागृहातून बाहेर पडणार : आप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला. राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाकडून त्यांना हा दिलासा मिळाला आहे.  केजरीवाल आता शुक्रवारी एक लाख ऊपयांच्या जातमुचलक्मयाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिहार तुऊंगातून बाहेर येऊ शकतात. आता त्यांना नियमित जामीन मिळाल्यामुळे आम आदमी पक्षातही आनंदाचे वातावरण आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी बनवण्यात आले होते. ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर मे महिन्यात ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने तुरुंगाबाहेर पडले होते. मात्र, प्रचाराचा कालावधी संपताच जामिनाची मुदतही संपल्याने त्यांना तिहार तुऊंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते.

केजरीवाल यांच्या जामिनाच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीवेळी ईडीचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. युक्तिवादादरम्यान केजरीवाल यांना दोषी ठरवण्यासाठी फिर्यादीकडे कोणतेही पुरावे नसल्याचा दावा त्यांच्या वकिलाकडून करण्यात आला होता. मात्र, ईडीने सबळ पुरावे असल्याचा आपला युक्तिवाद कायम ठेवला होता. आता ईडीचा युक्तिवाद फेटाळत न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. तपास यंत्रणेने 48 तासांची मुदतवाढ मागितली होती, ती न्यायालयाने फेटाळली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article