For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात ई-20 इंधनाच्या सक्तीविरोधात केजरीवाल मैदानात; 25 ऑगस्टला पणजीत बैठक, नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन

01:23 PM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात ई 20 इंधनाच्या सक्तीविरोधात केजरीवाल मैदानात  25 ऑगस्टला पणजीत बैठक  नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन
Advertisement

पणजी : गोव्यात ई-20 इंधनाच्या सक्तीच्या वापराचा मुद्दा आता राजकीयदृष्ट्याही तापण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ई-20 इंधनाच्या सक्तीविरोधात गोव्यात बैठक घेण्याची घोषणा केली आहे. ही सभा 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता मिरामार येथील ताज विवांता येथे आयोजित करण्यात आली आहे.

Advertisement

ई-20 इंधनामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांना या सभेत आपल्या समस्या थेट मांडता याव्यात, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.

ई20च्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळलेल्या ई-20 इंधनाच्या वापराबाबत वाहनचालकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः जुन्या वाहनांची कार्यक्षमता, इंधनाचा वापर आणि वाहनांच्या देखभालीच्या खर्चाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने गोव्यात ई-20च्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्याची तयारी केली आहे. केजरीवाल यांच्या बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच या मुद्द्यावर पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन

ई-20 इंधनामुळे त्रास होत असल्याचा अनुभव असलेल्या गोव्यातील वाहनचालकांनी आणि नागरिकांनी बैठकीला उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

ई-20च्या सक्तीविरोधातील या सभेमुळे गोव्यातील राजकीय वातावरणात नव्या मुद्द्याची भर पडण्याची शक्यता आहे. 25 ऑगस्टला पणजीत होणाऱ्या सभेत केजरीवाल काय भूमिका मांडतात आणि सरकारवर कोणते आरोप करतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.