महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अरविंद केजरीवालांकडून दहा ‘हमीं’ची घोषणा

06:45 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

200 युनिट वीज मोफत देण्यासोबतच ‘अग्निवीर’ रद्द करण्याचे आश्वासन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

तिहार तुऊंगातून बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने सभा घेत आहेत. या सभांमधून त्यांनी आप उमेदवारांचा प्रचार करण्यासोबतच ‘इंडिया’ आघाडीच्या समर्थनार्थ जोरदार भाषणबाजी सुरू केली आहे. रविवारी त्यांनी एका सभेमध्ये ‘केजरीवालांची हमी’ जाहीर केली. त्यानुसार ‘इंडिया’ आघाडीच्या हाती सत्ता सोपवल्यास 200 युनिट वीज मोफत देण्यासोबतच ‘अग्निवीर योजना’ रद्द करण्याचे आश्वासन दिले.

अंतरिम जामिनावर तुऊंगातून सुटल्यानंतर एका दिवसानंतर केजरीवाल यांनी ‘इंडिया’ आघाडी पुढील सरकार स्थापन करेल आणि आम आदमी पक्ष या आघाडीतील एक महत्त्वाचा पक्ष असेल असा दावा केला. पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी लोकांना ‘मोदींची हमी’ आणि ‘केजरीवालांची हमी’ यापैकी एक निवडावी लागेल असे सांगतानाच केजरीवाल यांची हमी हा ‘ब्रँड’ असल्याचे स्पष्ट केले. माझ्या अटकेमुळे यात थोडा विलंब झाला आहे, पण अजून बरेच टप्पे बाकी आहेत. ‘केजरीवालांच्या हमी’च्या नावाने हे हमीपत्र दिले जात असले, तरी या हमीपत्रांमुळे ‘इंडिया’ आघाडीच्या सदस्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे ते म्हणाले. मी दिलेल्या हमी ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून पूर्ण करण्याची हमी आज मी आपल्याला देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदारांसोबत दिलखुलास चर्चा

अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची आणि आमदारांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी देशाची धुरा फक्त आम आदमी पार्टी घेईल आणि आम आदमी पार्टीच देशाला भविष्य देईल असे स्पष्ट केले. यासोबतच मला 2 तारखेला तिहार जेलमध्ये परत जायचे आहे, त्यानंतर तुम्ही लोकांना पक्ष सांभाळावा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपला आम आदमी पार्टी तोडायची आहे. त्यांना पंजाब आणि दिल्लीतील आमची सरकारे पाडायची आहेत. आप नेत्यांना अटक करून सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र अटकेनंतर आमचा पक्ष अधिक मजबूत झाला. यासाठी तुम्ही सर्वच अभिनंदनास पात्र आहात, असे ते पुढे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश चमत्कारापेक्षा कमी नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट पेले.

केजरीवालांच्या 10 हमी-

  1. वीज : देशात 24 तास विजेची व्यवस्था करणार. देशातील गरिबांना 200 युनिट वीज मोफत दिली जाणार.
  2. शिक्षण : देशातील सर्व सरकारी शाळा उत्कृष्ट बनवणार. खासगी शाळेपेक्षा चांगले शिक्षण मिळेल. उत्कृष्ट आणि मोफत शिक्षणाची व्यवस्था करणार.
  3. आरोग्य : आरोग्य चांगले असेल तर देशाची प्रगती होते. सर्वांना मोफत उपचाराची सोय करण्यासाठी 5 लाख कोटी ऊपये खर्च करणार.
  4. देश सर्वोच्च : आम्ही सत्तेत आल्यास चीनने ताब्यात घेतलेली सर्व जमीन मुक्त करू. राजनैतिक पातळीवर प्रयत्न करणार. लष्कराला पूर्ण ताकद देणार.
  5. अग्निवीर : या योजनेंतर्गत चार वर्षांनंतर सैनिकांना काढून टाकले जाते. त्यामुळे अग्निवीर योजना बंद करून इच्छुकांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या जातील.
  6. कृषी : शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पूर्ण भाव मिळत नाही. स्वामीनाथन अहवालाच्या आधारे त्यांच्या पिकांना भाव दिला जाईल.
  7. दिल्ली : दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल.
  8. रोजगार : बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. वर्षभरात दोन कोटी रोजगार निर्माण होतील.
  9. भ्रष्टाचार : प्रामाणिक लोकांना तुऊंगात पाठवण्याची आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देणारी व्यवस्था संपुष्टात आणणार.
  10. कररचना : जीएसटी करप्रणाली सुलभ करण्यात येणार आहे. सरळमार्गाने व्यवसाय करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social mediaarvind kejriwalten guarantees
Next Article