अरुंधतीच्या दुखापतीने भारताला धक्का
06:00 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या सरावाच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज अरुंधती रे•ाrला दुखापत झाल्याने आता आगामी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. या सरावाच्या सामन्यात रेड्डीने सलामीची फलंदाज अॅमी जोन्सचा झेल टिपण्याच्या नादात ती मैदानात कोसळल्याने तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे तिला अद्यापही वेदना जाणवत असून तिला व्हीलचेअरच्या साहाय्याने मैदानाबाहेर घेवून जावे लागले. अरुंधतीची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात आले असून ती या आगामी स्पर्धेपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून गुवाहाटी येथे प्रारंभ होत आहे. भारत आणि लंका यांच्यात सलामीचा सामना खेळविला जाईल.
Advertisement
Advertisement