For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंधारी खूनप्रकरणी अरुण कापसेला अटक

03:28 PM Jan 16, 2025 IST | Radhika Patil
अंधारी खूनप्रकरणी अरुण कापसेला अटक
Advertisement

सातारा : 

Advertisement

अंधारी (कास ता. जावली) येथील संजय गणपत शेलार खून प्रकरणाचा तरुण भारतने सांगितल्याप्रमाणे 48 तासांच्या आतच उलगडा झाला. गेल्या 14 दिवसांपासून गूढ बनून राहिलेल्या या प्रकरणात सातारा-मेढा रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अरुण कापसे याला सातारा एलसीबीच्या सहाय्याने मेढा पोलिसांनी बुधवारी अटक केली. या खून प्रकरणात अरुण कापसे हा ‘आकाचा आका’ असल्याचे ‘तरुण भारत’ने स्पष्ट केले होते. दरम्यान, रात्री उशिरा परिणामांना अन्जाम देणारा ‘छोटा आकासुद्धा’ धाराशिवमध्ये जेरबंद करण्यात आला आहे.

संजय शेलार हा कास भागातल्या अंधारीसारख्या दुर्गम भागात राहणारा माणूस कन्स्ट्रक्शन कामगार होता. तसेच तो आणि त्याची बायको यांचा हॉटेलमध्ये काम करण्याचा रिवाज सुरू झाला. अचानक संजय शेलार, त्याची बायको आणि मुलगी जावलीतील बस्तान उठवून वाईला गेले. वाईमध्ये एका हॉटेलच्या कामावर काम करत असताना आणि वाईमध्ये रिक्षा व्यवसाय करत असतानाच संजय शेलारचा खून झाला.

Advertisement

वाईमधून आपल्या गावी म्हणजे अंधारीला स्वत:च्याच रिक्षातून निघालेल्या संजय शेलारचे खून झाल्यानंतर सीसीटीव्ही तपासण्यात आले त्यावेळी संजय रिक्षा चालवत असताना एक माणूस पाठीमागे बसल्याचे दिसत होते. त्याच रात्री त्याचा निर्घृण खून करण्यात आला. घटनास्थळी त्याचा मृतदेह केवळ अंतरवस्त्रामध्ये सापडला.

  • खूनाचे कारण काय?

घटनास्थळ मेढा पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे हा गुन्हा मेढा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. प्राथमिकदृष्ट्या संजय शेलारला दारूचे व्यसन असल्यामुळे हा खून आर्थिक देवाणघेवाणीतून झाला असल्याचे मानून तपास करण्यात आला. मात्र धागेदोरे मिळाले नाहीत. तपासात सारा केंद्रबिंदू सीसीटीव्हीत रिक्षाच्या मागे बसलेला ‘आका’ कोण? याकडे केंद्रित झाला.

  • आकाचा आका’ कोण?

2 जानेवारी रोजी खून झालेल्या घटनेचा तपास सलग 14 दिवस वळणावर येत नव्हता. काहीच केल्या थांगपत्ता न लागल्यामुळे याबाबतचे गूढ वाढले. सीसीटीव्हीतील आकाने खून केल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी या आकाला वाचवणारा आकाचा आका कोण तरी आहे हे स्पष्ट झाल्यामुळेच अंधारी आणि परिसरातील गावांमध्ये प्रचंड संताप होता.

संजय शेलारच्या वडिलांनी सांगितल्यावरुन आकाचा आका कोण? हे लोकांना कळले होते. मात्र कारवाई होत नव्हती.

  • सातारा पोलिसांची हुशारी

या प्रकरणाला शासकीय दृष्ट्या जे वळण लागत असले तरी वस्तुस्थिती वेगळी होती. सातारा पोलीस त्याप्रकारे तपासच करत नाहीत. असे वातावरण बनले होते मात्र या प्रकरणात खुनाची फिर्याद ही संजय शेलारच्या वडिलांना न करता त्याच्या बायकोला करून सातारा पोलिसांनी अर्धी लढाई जिंकली होती.

  • अखेर अरुण कापसेच्या बेड्या बांधल्या गेल्या

संजय शेलार आणि त्याची बायको जावलीत असून वाईत काम करते. याच बरोबर संजयच्या बायकोने रसिकाने हिने दिलेला जबाब यावरून जलसागर आणि पिकॉक हॉटेलचे मालक अरुण कापसे यांना बुधवारी सरतेशेवटी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. ग्रामस्थ आणि आंदोलक यांच्या म्हणण्याप्रमाणे झालेल्या या अटकेचे स्वागत अनेकांनी केले. अरुण कापसे हे जावली तालुक्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक म्हणून मानले जातात. तसेच त्यांचा राजकीय जीवनामध्ये सुद्धा मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांना झालेली अटक ही सातारा जिल्ह्यासाठी धक्कादायक मानली जात आहे.

  • न्याय व्यवस्थेमुळे सारेच हैराण

संजय शेलार खून प्रकरणी ठोस पुरावे मिळाल्यामुळेच अरुण कापसेला जेरबंद करून मेढा न्यायालयापुढे दुपारी 4 वाजून 28 मिनिटांनी हजर करण्यात आले. आणि 10 दिवसांची कोठडी मागितली. तरी उशिरापर्यंत याबाबत न्यायालयाने निर्णय दिला नव्हता. न्यायालयीन दिरंगाईमुळे सारीच यंत्रणा हतबल झाली. महाराष्ट्रात वाल्मिक कराड प्रकरण गाजत असताना झालेली ही दिरंगाई सोशल मीडियावर जास्तच व्हायरल होवू शकते.

  • आकाचा आका’ अटक, आकासुद्धा जेरबंद

गेल्या 14 दिवसांपासून गूढ बनलेल्या या खून प्रकरणात आकाचा आका असा उल्लेख झालेला अरुण कापसे या एलसीबीच्या सहाय्याने मेढा पोलिसांनी अटक केली. मात्र परिणामाला अंजाम देणार कोण? हा प्रश्न निरूत्तरीत असतानाच सातारा एलसीबीने धाराशिवमध्ये संभाव्य आरोपीला जेरबंद केले आहे. साताऱ्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला हा छोटा आका सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात असून गुरूवारीच त्याला न्यायालयात दाखल केले जाईल.

  • जलसागरचा मासा लागला गळाला

संजय शेलार खून प्रकरणानंतर हॉटेल जलसागर जास्तच चर्चेत आले. सोशल मीडियावरील भयाण चर्चेनंतर सोशल मीडियाच्या चर्चेप्रमाणेच जलसागरचा मासा पोलिसांच्या सापळ्यात अडकला. हे खूप टेंडिंग झाले. थोडक्यात जलसागरचा मालक अरुण कापसेला अटक व्हावी ही सोशल मीडियाची मागणी होती.

Advertisement
Tags :

.