For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहुजन समाज पार्टीच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अरुण जाधव यांची निवड

बहुजन समाज पार्टीच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अरुण जाधव यांची निवड
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी : बहुजन समाज पार्टीच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदीओटवणे येथील अरुण जाधव यांची निवड करण्यात आली आहे. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर माणगावकर आणि जिल्हा महासचिव दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिकृत नियुक्तीपत्र अरुण जाधव यांना प्रदान करण्यात आले आहे.
बहुजन समाज पार्टी (BSP) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पक्षाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय आणि जिल्हा पातळीवरील वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या संमतीने सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी अरुण लक्ष्मण जाधव यांच्यावर देण्यात आली आहे. अरुण जाधव यांची बहुजन समाज पार्टी या पक्षाप्रती असणारी निष्ठा, सामाजिक कार्याची आवड आणि मजबूत संघटनात्मक कौशल्य लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
बहुजन समाज पार्टीचे ध्येय-धोरण, परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि श्री. कांशीराम यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे अरुण जाधव यांनी या नियुक्तीनंतर सांगितले. तसेच सावंतवाडी तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी गावागावात बैठका लावून ग्राम कमिट्या स्थापन करणार असल्याचे अरुण जाधव यांनी सांगितले. या निवडी बद्दल अरुण जाधव यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.