आर्थर फिल्स, कोको गॉफ विजेते
पुरुष विभागात फ्रान्सेस टिफोई तर महिला विभागात पेगुला उपविजेते
► वृत्तसंस्था, सिनसिनॅटी
येथे नुकत्याच झालेल्या सिनसिनॅटी खुल्या 1000 दर्जाच्या मास्टर्स एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या आर्थर फिल्सने पुरुष एकेरीचे तर अमेरिकेच्या कोको गॉफने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेनंतर आता 2026 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला न्यूयॉर्कमध्ये सोमवारपासून प्रारंभ झाले आहे.
पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात आर्थर फिल्सने अमेरिकेच्या फ्रान्सेस टिफोईचा 6-3, 1-6, 6-0 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. फिल्सचे एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेतील हे पहिले विजेतेपद आहे. या अंतिम सामन्यात फिल्सला पहिल्या सेटमध्ये सूर मिळाला नाही. पण त्याने आपली सर्व्हिस अधिक काळ राखत तसेच बेसलाईन खेळाच्या जोरावर हा सेट 6-3 असा जिंकून टिफोईवर आघाडी मिळविली. या पहिल्या सेटमध्ये टिफोईला केवळ तीन गेम्स जिंकता आले. मात्र दुसऱ्या सेटमध्ये टिफोईने वेगवान सर्व्हिसच्या जोरावर आपली सर्व्हिस अधिकवेळ राखत हा सेट 6-1 असा जिंकून फिल्सशी बरोबरी साधली. या सेट्मध्ये फिल्सला केवळ 1 गेम जिंकता आला. मात्र तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये फिल्सने टिफोईची तीनवेळा सर्व्हिस भेदत रॅलीज गेमवर हा सेट 6-0 असा जिंकून जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या सेटमध्ये टिफोईला एकही गेम्स जिंकता आला नाही. 21 व्या मानांकीत फिल्स आता अमेरिकन टेनिस स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. अमेरिकेच्या टिफोईने या स्पर्धेत दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती.
गॉफ विजेती
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने आपल्याच देशाच्या तृतिय मानांकीत जेसिका पेगुलाचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. सलामीच्या सेटमध्ये 22 वर्षीय गॉफने पेगुलाची दोनवेळा सर्व्हिस तोडत 5-2 अशी आघाडी मिळविली. गॉफने हा पहिला सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये गॉफने आपली सर्व्हिस राखत सुरुवातीलाच 3-0 अशी आघाडी पेगुलावर घेतली होती. त्यानंतर पेगुलाने गॉफची सर्व्हिस भेदत तिची आघाडी थोडी कमी केली. दुसऱ्या सेट्मध्ये पेगुलाकडून वारंवार चूका झाल्याने गॉफने दुसरा सेट 6-4 असा जिंकून जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. गॉफने सिनसिनॅटी स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली आहे. या स्पर्धेत पेगुलाने गेल्या शनिवारी पोलंडच्या विद्यमान विजेत्या स्वायटेकचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. गॉफने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत दोनवेळा ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविले आहे तसेच तिचे हे वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील एकेरीतील 12 वे विजेतेपद आहे. गॉफ आता