For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आर्टेमिस टू“ यशस्वी ‘चंद्र“ मोहीम : मानवतेसाठी मोठे उड्डाण

06:51 AM Apr 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘आर्टेमिस टू“ यशस्वी ‘चंद्र“ मोहीम   मानवतेसाठी मोठे उड्डाण
Advertisement

मानवानं शेवटचा चंद्रप्रवास 1972 मध्ये अपोलो 17 मोहिमेद्वारे केला. त्यानंतर जवळपास या पन्नास वर्षांत अंतराळ संशोधनात प्रचंड मोठी झेप घेतली आहे. पण चंद्रावर पुन्हा मानव पाठवण्याचा प्रयत्न झाला नाही. नासाने चंद्रावर पुन्हा मोहीम सुरु केली आहे. आता नासाची आर्टेमिस टू मोहीम पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. या मोहिमेत चार अंतराळवीरांनी चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली असून अगदी जवळून आजवर कुणीही न पाहिलेल्या चंद्राच्या भागाचे दर्शन घेतले आहे. नासाच्या चंद्रावरील आर्टेमिस टू मोहिमेने आता जगासमोर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोचे खास वैशिष्ट्या म्हणजे या फोटोमध्ये चंद्राचा असा भाग दिसत आहे, जो मानवाने कधी पूर्णपणे पाहिलेला नव्हता. या फोटोत चंद्राच्या कडेला एक मोठे क्षेत्र दिसत आहे, ज्यास ओरिएंटल बेसिन म्हटले जाते. नासाने सांगितले की पहिल्यांदा असे झाले आहे की चंद्राच्या या भागाला मानवी डोळ्यांनी पहिल्यांदा पाहिले गेले आहे. या मोहिमेवर चार अंतराळवीर गेले असून तीन अमेरिकेतील आणि एक कॅनडामधील आहे. कॅनाडाच्या जेरेमी हॅनसेन आणि अमेरिकेच्या व्हीक्टर ग्लोव्हर, रीड व्हाईसमॅन आणि क्रिस्टीना कोच यांचा सहभाग आहे. हे अंतराळवीर ओरियन नावाच्या स्पेसक्राफ्टमध्ये सवार झाले आहेत. चंद्राच्या मोहिमेवर जाणाऱ्या क्रिस्टीना कोच पहिल्या महिला अंतराळवीर बनणार आहेत. तर व्हीक्टर ग्लोवर पहिले अश्वेत अंतराळवीर होतील जे या मोहिमेचा भाग बनले आहेत.

Advertisement

आर्टेमिस टू या मोहिमेचा मुख्य उद्देश हा आहे की चंद्राच्या त्या भागाची माहिती आणि फोटो घेणे आहे जो भाग पृथ्वीवरुन आजवर कधीच दिसलेला नाही. हे अंतराळ यान पृथ्वीपासून सुमारे 2,52,000 मैल म्हणजे सुमारे 4 लाख किलोमीटर दूरपर्यंत जाणार आहे. हे चंद्राला वळसा घालून पुन्हा पृथ्वीवर येणार आहे, परंतु चंद्रावर उतरणार तर नाहीच, शिवाय त्याच्या कक्षेतही प्रवेश करणार नाही. ही मोहिम आतापर्यंत मानवाने कापलेल्या अंतरापेक्षा जास्त अंतराची ठरणार आहे. हा रेकॉर्ड सध्या अपोलो 13 मोहिमेकडे आहे. ही मोहीम सुमारे 10 दिवसांची आहे.

आर्टेमिस मिशनची क्रमवारी

Advertisement

आर्टेमिस वन  (2022) : मध्ये मानवरहित चाचणी उ•ाण झालं होतं. आर्टेमिस टू: मध्ये आता मानवासह चंद्राभोवती फेरी चार अंतराळवीर फेरी मारणार आहेत. तसंच त्याचा अभ्यास करणार आहेत.

आर्टेमिस थ्री : मेहिमेत मानवाचं पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

या मोहिमेतील अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार नाहीय, ते फक्त चंद्राभोवती फेरी मारतील. कारण आर्टेमिस टू चे मुख्य उद्दिष्ट जीवनरक्षक प्रणाली, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन, उष्णता संरक्षण या सर्व प्रणालीचा मानवासह अभ्यास करणे आहे.

आर्टेमिस टू मोहीम का महत्त्वाची?

आर्टेमिस थ्री मध्ये थेट लँडिंग होणार आहे. त्यामुळं त्याआधी आर्टेमिस टू मोहिमेत सर्व चाचण्या आणि अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामुळं आर्टेमिस थ्री मध्ये चंद्रावर पाऊल ठेवणं सोपं होणार आहे. याव्यतिरिक्त अंतराळयानांचा तांत्रिक बिघाड, उष्णता संरक्षण प्रणालीची अचूकता अशी प्रमुख आव्हानं आणि धोके यात असतील. त्यामुळं या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. या मिशनमध्ये चंद्रावर दीर्घकालीन बेस तयार करण्याचा नासाचा प्रयत्न आहे. यातूनच मंगळ ग्रहावर जाण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची चाचणी होईल. आर्टेमिस प्रोगाम तयार करण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत असून त्यात हजारो लोकांनी काम केलं आहे. आतापर्यंत त्यावर सुमारे 93 अब्ज डॉलरचा खर्च झाला. 50 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या अपोलो मोहिमेमुळे इतिहास घडला, तेव्हा पहिल्यांदा माणसं चंद्रावर उतरली. पुन्हा चंद्रावर जाण्यासाठी अमेरिका इतका वेळ, मेहनत आणि पैसा का खर्च करत आहे? चंद्रावरही तेच घटक आढळतात जे पृथ्वीवर आहेत. उदाहरणार्थ, ‘रेअर अर्थ’ घटक पृथ्वीवर खूप कमी प्रमाणात सापडतात, पण चंद्रावर काही ठिकाणी ते इतके जास्त असू शकतात की तिथून त्यांचं खाणकाम (मायनिंग) करता येऊ शकतं. चंद्रावर लोखंड (लोह) आणि टायटॅनियमसारखे धातूही आहेत, तसेच हेलियमसारखा वायूही आहे, जो सुपरकंडक्टरपासून ते वैद्यकीय उपकरणांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये वापरला जातो. पण सर्वात जास्त महत्त्वाचं असं संसाधन म्हणजे पाणी आहे. नासाची नजर आता मंगळावर आहे आणि 2030 च्या दशकात माणसं पाठवण्याची त्यांची योजना आहे.

  • -  प्रा. डॉ. गिरीश नाईक
Advertisement
Tags :

.