कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बी. एस. बांदेकर कॉलेजमध्ये उद्या कलाप्रदर्शनाचे उ‌द्घाटन

05:35 PM Mar 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाइड आर्ट) कला महाविद्यालयाच्या वार्षिक कलाप्रदर्शनाचे उ‌द्घाटन बुधवार दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीचे जाहिरात तज्ज्ञ श्री. प्रशांत गोडबोले व विशेष अतिथी म्हणून श्री. विक्रम गायकवाड व श्री. सुनिल महाडिक हे जाहिरात क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. सदर कला प्रदर्शन दिनांक ०६ मार्च ते ०९ मार्च या कालावधीत सकाळी १०.०० ते सायं. ०६.०० पर्यंत सर्व कलारसिकांसाठी खुले राहील. सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जाहिरात व कलाक्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेले काम पाहण्यास मिळेल. तसेच या प्रदर्शनाचे औचित्य साधून कोकणचे सुपुत्र व जागतिक किर्तीचे सुलेखनकार श्री अच्युत पालव यांना जाहीर झालेला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार व महाविद्यालयाच्या विकासातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल महाविद्यालयातर्फे सत्कार आयोजित करण्यात आला आहे. सर्व कलारसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष श्री रमेश भाट व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री उदय वेले यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # b.s . bandekar coolege of fine art # sawantwadi
Next Article