For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘जीवन बीमा योजना’मध्ये अरशद

06:49 AM Jun 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘जीवन बीमा योजना’मध्ये अरशद
Advertisement

अभिनेता अरशद वारसी एक डार्क कॉमेडी थ्रिलरपट ‘जीवन भीमा योजना’ घेऊन येत आहे. चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यात आले असून यात अरशद दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून यात कॉमेडी अन् ड्रामाची पूर्ण झलक दिसते.

Advertisement

अरशद वारसीच्या एका भूमिकेचा रस्ते दुर्घटनेत मृत्यू होतो. मग अरशदची दुसरी भूमिका स्वत:सारखा चेहरा असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूचा फायदा उचलत विमा रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. यादरम्यान अनेक अडचणी येतात, ज्या चित्रपट पाहिल्यावर कळू शकणार आहेत.

अरशद या चित्रपटात एकसारखा चेहरा असलेल्या दोन व्यक्तींची भूमिका साकारत आहे. दोघांचे जीवन अनपेक्षित अन् धोकादायक पद्धतीने परस्परांशी जोडलेले असते. यानंतर गुन्हे, धोका अन् डार्क ह्यूमरने युक्त घटना सुरू होता. जीवन भीमा योजना चित्रपट आमिष, हतबलता, प्रेम अन् चुकीच्या निर्णयाच्या दूरगामी परिणामांची कहाणी आहे.

Advertisement

अभिषेक डोगराकडून दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अंशु मिश्रा यांच्याकडून करण्यात आली आहे. चिर्घ्पटात अरशद वारसीसोबत संजीदा शेख, विजय राज, पूजा चोप्रा आणि बिजेंद्र काला यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.