बाजारात हिवाळी फळ-भाज्यांची आवक
कोल्हापूर :
हिवाळी हंगामातील नागपुरी संत्र्यांची आवक सुरू झाली आहे. पाठोपाठ हंगामातील हिरवा वाटाणाही व गाजरही दाखल झाले आहे. नागपुरी संत्र्यांची आवक वाढत असून याचे दरही आवाक्यात असल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे. पुढील काही दिवसात नागपुरी संत्र्यांची मोठी आवक होणार आहे. परिणामी त्याचे दर आणखी कमी होणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
हिवाळी हंगामातील दाखल झालेल्या हिरवा वाटाण्याचा प्रतिकिलोचा दर 200 रूपये आहे. आवक जेमतेम असल्याने याचे दर चढे आहेत. पुढील आठवड्यात हिरव्या वाटाण्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे त्याचे दर कमी होतील, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. गाजराची आवकही कमीच आहे. त्याचा प्रतिकिलोचा दर 100 रूपये असा आहे.
दोन दिवसात कोथंबीरच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. दोन दिवसांपुर्वी कोथंबीरच्या एका पेंडीचा दर 10 रूपये असा होता. गुरूवारी यामध्ये अचानक वाढ होऊन एका पेंडीचा दर 25 ते 30 रूपये झाला आहे. हिवाळ्यात पालेभाज्यांनी मागणी वाढलेली असते. मात्र, पालेभाज्यांची आवकही कमी झाली असल्याने दरातही वाढ झाली आहे. मेथी 30 ते 40 रूपयाला एक पेंडी व पोकळा, पालक, कांदापात 20 ते 30 रूपये पेंडी झाली आहे. तर शेपूची भाजी बाजारात दिसेनाशी झाली आहे.
चिकन, मटणची उलाढाल वाढली
विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या रोजच्या जेवणावळींना ऊत आला होता. कार्यकर्त्यांसाठी मांसाहाराची मेजवानी दिली जात असल्यामुळे चिकन, मटणाला अधिक मागणी होती. गत आठवड्यात रोज 3 टन मटण तर 6 टन चिकनची उलाढाल होत होती. आता हिवाळा सुरू झाला असल्याने नागरिकांचा मांसाहाराकडे कल वाढला आहे. त्यामुळे मटण, चिकन, अंडी, माशांना मागणी वाढली आहे.
केळी दर घसरला
बाजारात केंळींची आवक वाढली आहे. थंडीमुळे केळींना मागणी कमी झाली आहे. त्यामुळे केळींचे दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात जवारी केळींच्या एका क्रेटमागे 100 व वसई केळींच्या एका क्रेटमागे 200 रूपयांनी घसरण झाली आहे. गुरूवारी लक्ष्मीपुरी बाजारात जवारी केळी 30 ते 40 रूपये तर वसई केळी 20 ते 30 रूपये डझन दराने विक्री सुरू होती.
फळांच्या खरेदीसाठी गर्दी
आरोग्यास लाभदायक असलेली हिवाळ्यातील हंगामी फळ-भाज्या बाजारात दाखल होत आहेत. फळांमध्ये नागपुरी संत्री, सफरचंद, चिकू, डाळींब आदी फळांची रेलचेल वाढली आहे. भाज्यांमध्ये हिरवा वाटाणा, फ्लॉवर, गाजरची आवक वाढत आहे. त्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.
खाद्यतेलाचे दर चढेच
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढलेले सर्वच खाद्यतेलाचे दर अजूनही चढेच आहेत. ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर भडकल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागली होती. दिवाळीनंतर याचे दर उतरतील अशी, शक्यता होती. मात्र, अजूनही याचे दर चढेच आहेत. त्यातच कांदा, लसूणही तेजीत असून महिलांचे किचनमधील बजेट कोलमडले आहे.
भाज्यांचा दर (प्रतिकिलो)
हिरवा वाटाणा : 200 रूपये, हंगामी गाजर : 100 रूपये, लसुण : 350 ते 400 रूपये, टोमॅटो : 20 ते 30 रूपये, कोथंबीर : 20 ते 25 रूपयाला एक पेंडी, कांदा : 40 ते 50 रूपये, बटाटा (इंदौर) 35 ते 40 रूपये, वांगी : 100 रूपये, दोडका 100 रूपये, ढबु 80 रूपये, भेंडी : 100 रूपये, वरणा : 100 रूपये, गवारी : 100 ते 120 रूपये, कारली : 80 रूपये, हिरवी मिरची 100 रूपये, आले : 100 रूपये, बीनिस 80 रूपये, पापडी 100 ते 120 रूपये, काटेरी काकडी : 40 रूपये, फ्लॉवर : 30 ते 50 रूपये एक नग, कोबी : 20 ते 30 रूपये नग, दुधी भोपळा 20 ते 30 रूपये 1 नग.
फळांचे दर (प्रतिकिलो) :
नागपुरी संत्री : 100 रूपये, सफरचंद (वॉशिंग्टन) 80 ते 120 रूपये, सफरचंद (इंडियन) : 100 ते 130 रूपये, सफरचंद (तुर्की) : 150 रूपये, डाळींब : 60 ते 120 रूपये, मोसंबी : 50 रूपये, सीताफळ : 20 ते 50 रूपये, पेरू : 20 ते 50 रूपये, पपई : 20 ते 30 रूपये 1 नग, किवी : 100 रूपयाला तीन नग, ड्रॅगन : 60 ते 100 रूपये, केळी जवारी : 50 ते 80 रूपये डझन, वसई : 30 ते 50 रूपये डझन, ड्रॅगन : 70 रूपये.
सागरी माशांचे दर (प्रतिकिलो) : सुरमई : 800 ते बाराशे रुपये, पापलेट : 800 ते 1300 रूपये, बांगडा : 200 ते 280 रुपये, रावस : 400 ते 500, सारंग : 500 ते 600 रूपये, पालू : 200 ते 250 रूपये, मांदेली : 160 ते 180 रूपये, बोंबील : 260 ते 320, झिंगा : 400 ते 600 रुपये, शिंपल्या : 160 ते 200, तांबोशी : 600, मोडूसा : 500 ते 600, तारली : 300 ते 400 रुपये, कनक : 600 ते 700 रूपये.
नदीतील माशांचे दर : (प्रतिकिलो)
टाकळी : 140 रूपये, पालु : 140 ते 200 रूपये, रावस : 160 ते 180 रूपये, मरळ : 300 ते 360 रूपये, रूपचंद : 150 ते 160 रूपये, शिवडा : 300 ते 420 रूपये, कटला : 180 ते 200 रूपये. मांगुर : 120 ते 160 रूपये, रहु : 160 ते 200 रूपये, हैद्राबादी (आंध्रप्रदेश) टाकळी : 120 ते 160 कटारणी : 300 ते 400 रूपये, लोकल रंकाळा, पंचगंगा टिलाप : 100 ते 120 रूपये, वाम (आकारानुसार) 500 ते 600 रूपये नग, वंझ : 300 रूपये, तांबर : 120 ते 160 रूपये.
चिकन, मटण दर : (प्रतिकिलो)