फुलांच्या वर्षावात, ढोल-ताशांच्या गजरात 'विट्याचा राजा'चे आगमन
विटा :
जिल्ह्यातील प्रसिद्ध 'विट्याचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भव्य मूर्ती काल विटा शहरात दाखल झाली. या आगमनाने विटा शहर गणेशमय झाले. गुरुवारी सायंकाळी उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
शहरात सकाळपासून नागरिक विट्याच्या राजाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. सायंकाळीच्या सुमारास मूर्ती शहरात दाखल होताच प्रमुख मार्गावर भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली. ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांच्या वर्षावात मूर्तीचे जल्लोषात स्वागत केले. 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या गजराने वातावरण दणाणून गेले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर, कार्याध्यक्ष आमदार सुहास बाबर, उपाध्यक्ष अभिजीत पवार व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नवसाला पावणारा गणपती म्हणून विट्याच्या राजाची ओळख असंख्य भाविकांच्या मनात आहे. मूर्तीच्या स्वागतासाठी सर्व वयोगटातील गणेशभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरातील प्रमुख रस्ते, चौकामधून वाजत-गाजत स्वागत झाले