For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुलाबी थंडीचे आगमनाने गगनबावडा गर्दीने फुलला !

01:16 PM Dec 04, 2023 IST | Abhijeet Khandekar
गुलाबी थंडीचे आगमनाने गगनबावडा गर्दीने फुलला
Gaganbavada
Advertisement

लखमापूर, अंदुर, कोदे, वेसरफ तलाव पर्यटकांचे आकर्षण

Advertisement

विजय पाटील : असळज

गगनबावडा परिसर दिवाळी सुट्यांमुळे पर्यटकांनी फुल्ल झाला आहे. ‘मिनी महाबळेश्वर ‘ म्हणून गगनबावड्या चा उल्लेख केला जातो. वातावरणात थोडीशी थंडी पडू लागल्याने शाळांच्या सुट्यांमुळे हिवाळ्यातील गुलाबी थंडी असून पर्यटकांची वर्दळ गगनबावड्यात पहावयास मिळत आहे . कोकणाला जोडण्राया करूळ व भुईबावडा या दोन्ही घाटमाथ्यामुळे गोवा, सिंधुदुर्ग या सह कोकण दर्शनासाठी जाण्राया पर्यटकांची रिगलागलेली दिसत आहे. गगनबावड्यातील निसर्गसौंदर्यात भर घालणारे लखमापूर ,अंदुर ,कोदे , वेसरफ या ठिकाणी असणारी तलाव पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनली आहेत सहाजिकच पर्यटकांचा त्याठिकाणी ओढा वाढलेला दिसतो. पाण्याने भरलेले तलाव सभोवताली हिरवळ झाडी काही ठिकाणी असणारे सिमेंट कट्टे मनसोक्त पोहणे यामुळे तलाव ठिकाणी कुटुंबासह सहली आयोजित केल्या जात आहेत. पर्यटकांच्या वाढत्या वावरामुळे सभोवताली चार चाकी ,दोन चाकी ,वाहनांची गर्दी दिसून येत आहे. डोंगराळ दुर्गम कोदे व अंदूर या तलावाजवळ पर्यटकानां जेवणासाठी हॉटेल सुविधाही मिळत आहेत त्यामुळे तलावाजवळ पर्यटकांची जथेच्या जथ्थे दिसून येतात.हिरवेगार डोंगर माथ्यावरील प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते गगनबावडा येथील गगनगिरी महाराज गगनगिरी मठावरून कोकण दृश्य टिपण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दोन्ही घाटमाथ्याच्या मध्ये असण्राया गगनगडावरून कोकण दृश्य टिपता येते. पळसंबे येथील जंगलातील शांत वातावरणातील रामलिंग मठ ( पुरातन लेणी )पुरातन काळाची आठवण करून देतात .येथील थंड पाण्याबरोबर प्राचीन लेणी भूरळ घालणारी आहेत बोरबेट येथील मोरजाई व वेताळमाळ येथील निसर्गाच्या सानिध्याचा पर्यटकांना आस्वाद घेता येतो. पर्यटकांच्या या गर्दीमुळे हॉटेल, किराणा दुकान निवास्थान यांना अच्छे दिन आले आहेत.

मद्यपींचा पर्यटकांना त्रास
तलाजवळ पाणी असल्याने कुटुंबासह आलेले अनेक पर्यटक स्वत? जेवण तयार करतात . त्या ठिकाणी काही तरुण मंडळी दारु पिऊन तर्र अवस्थेत असतात. त्यामुळे महिला पर्यटकांना स्थानिक स्त्रिया व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो .त्यामुळे त्या मद्यपींचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
दत्तात्रय गुरुव मु. अणदुर ता. गगनबावडा

Advertisement

Advertisement
Tags :

.