For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोमवारीही मान्सूनपूर्व पावसाचे आगमन

06:22 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोमवारीही मान्सूनपूर्व पावसाचे आगमन
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

मान्सूनपूर्व पावसाचे सोमवारी जोरदार आगमन झाले. दुपारी 4 च्या सुमारास शहरासह काही उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. बाजारपेठेतील फेरीवाले, भाजी विक्रेते आणि इतर बैठ्या व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. काहीवेळ पाऊस पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली.

सकाळपासूनच उष्म्यामध्ये वाढ झाली होती. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाल्याची चर्चा असताना दुपारी मात्र कडक उन पडले. त्यानंतर 4 च्या दरम्यान पावसाचे जोरदार आगमन झाले. या पावसामुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांना आडोसा शोधावा लागला. काही ठिकाणी रस्त्यावरच पाणी साचून होते. त्यामुळे पादचाऱ्यांना वाट काढताना कसरत करावी लागली.

Advertisement

केवळ अर्धातास पाऊस झाला. यामुळे पुन्हा बाजारपेठेमध्ये व्यवहार सुरू झाले. सध्या शेतकऱ्यांनी भात पेरणी केली आहे. तर काही शेतकरी अजूनही मशागत करत आहेत. भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. तर मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र हा पाऊस मारक ठरला असून मशागतीची कामे खोळंबली आहेत. भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची नितांत गरज असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
Tags :

.