For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किरकोळ बाजारात आंब्यांची आवक

10:46 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
किरकोळ बाजारात आंब्यांची आवक
Advertisement

हापूस, लोकल आंबा दाखल : दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात

Advertisement

बेळगाव : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूसबरोबरच इतर स्थानिक आंबाही बाजारात दाखल होऊ लागला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारपेठ आंब्यांनी बहरू लागली आहे. विशेषत: आंब्यांचे दर हळूहळू सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत आहेत. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि फळांना अधिक पसंती दिली जात आहे. रसाळ फळांबरोबरच आंब्यांची मागणीही वाढू लागली आहे. किरकोळ बाजारात स्थानिक आंबाही दाखल होऊ लागला आहे. किरकोळ विक्रेत्यांकडे 100 रुपये किलो दराने हा आंबा विक्री होत आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवण येथूनही हापूस दाखल होऊ लागला आहे. हे हापूस 500 ते 1000 रुपये डझनप्रमाणे तर लोकल आंबा 200 ते 300 रुपये डझनप्रमाणे विक्री होत आहे.

हापूसच्या नावावर लोकल आंब्यांची विक्री

Advertisement

बाजारात हापूसच्या नावावर लोकल आंब्यांची विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ लागली आहे. आंब्यांच्या पेटीवरती हापूसचे चित्र असते. मात्र प्रत्यक्षात पेटीत लोकल आंबा घातला जातो. त्यामुळे ग्राहकांनी सावध राहणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.