For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवाल, मान यांचे गोव्यात आगमन

11:45 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवाल  मान यांचे गोव्यात आगमन
Advertisement

पेडणे : गोव्यातील जनतेने दिलेले प्रेम, आप या पक्षाबद्दल त्यांच्या मनात असलेली आस्था आणि गोवेकरांनी आम्हाला भेटण्यासाठी बोलविले म्हणून आम्ही गोव्यात आलो आहोत, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर पत्रकारांकडे बोलताना सांगितले. गुऊवारी सायंकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे मोपा विमानतळावर सायंकाळी उतरले. त्यावेळी त्यांचे गोवा आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा, वाल्मिकी नाईक, सुरेल तिळवे, अॅड. प्रसाद शहापूरकर, देवेंद्र प्रभूदेसाई तसेच आप पक्षाचे पदाधिकारी यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान म्हणाले की, गोव्यात आप पक्षाचे मोठ्या संख्येने चाहते आहेत आणि गोवेकरांनी विधानसभेसाठी दोन आमदार निवडून दिलेले आहेत. गोव्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि आमदारांनी केलेली कामे पाहण्यासाठी आम्ही गोव्यात आलेलो आहोत. आज शुक्रवारी गोव्यातील आमदारांसोबत तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

लोकसभेसाठी दक्षिणेतील जागेची मागणी करणार

आमदार क्रूज सिल्वा म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे दोघेही गोव्यात दाखल झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. गोव्यातील आप पक्षाचे कार्य आहे ते तळागाळात पोचलेले आहे आणि येणाऱ्या लोकसभेसाठी आम्ही दक्षिणेतील जागा ‘आप’ला मिळावी ही आमची मागणी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.