For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कळंबा तलावावर विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन; संख्या मात्र घटली

01:37 PM Jan 05, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   कळंबा तलावावर विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन  संख्या मात्र घटली
Advertisement

                                  कळंबा तलावावर पंखधारी पाहुण्यांचा विहार

Advertisement

कळंबा : हिवाळ्याची चाहूल लागताच कळंबा तलावावर विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. उत्तर युरोप, सायबेरिया आणि मध्य आशियातून हजारो कि.मी.चा कष्टाचा प्रवास करून येणारे हे पंखधारी पाहुणे तलावाच्या शांत पाण्यात विहार करत आहेत. नॉर्दर्न पिटेल, युरेशियन बिगॉन, नॉर्दर्न शॉ व्हलर, शेलडक यासारख्या विदेशी बदकांच्या प्रजाती आणि इतर पाणपक्षी येथे थांबतात. हे दृश्य निसर्गप्रमींना आनंद देत असले तरी यंदा पक्ष्यांची संख्या गेल्या काही वर्षाच्या तुलनेत कमी दिसत आहे.

कळंबा तलाव हा कळंबा गावसह कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पुरवठा या तलावातून होतो. दरवर्षी ऑ क्टोबर-नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत हा तलाव स्थलांतरित पक्ष्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनतो. शांत पाणी, मुबलक अन्नसाठा आणि तुलनेने कमी मानवी हस्तक्षेप यामुळे हे पक्षी येथे येतात. यंदा डिसेंबर महिन्यात तलावावर विविध प्रजातींचे बदकांचे थवे दिसत आहेत.

Advertisement

पहाटेच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात पाण्यावर तरंगणारे हे रंगीबेरंगी पक्षी शहरातील नागरिकांसाठी एक सुंदर नजारा ठरतात. तलावात वेगवेगळ्या जातीचे युरेशियन विगॉन आणि नॉर्दर्न पिटेल सारख्या प्रजाती यंदाही आल्या आहेत, पण त्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. मागील वर्षी 'बर्ड्स ऑफ कोल्हापूर या गटाने केलेल्या पक्षी गणनेत कळंबा तलावावर १०५ प्रजातींच्या ११६१ पक्ष्यांची नोंद झाली होती. त्यात १९ स्थलांतरित प्रजातींचा समावेश होता. यंदा मात्र ही संख्या रोडावली आहे. काही प्रजाती तर अगदी विरळ स्वरूपात दिसत आहेत. हे फक्त कळंबा तलावापुरतेच नाही, तर जिल्ह्यातील इतर तलाव भागांमध्येही असेच चित्र आहे. हवामान बदल आणि मानवी क्रियांमुळे पक्ष्यांचे पारंपरिक स्थलांतर मार्ग बदलत आहेत.

स्थलांतरित पक्षी केवळ सौंदर्याचे प्रतीक नाहीत, तर निसर्गसाखळीतील महत्वाचे दुवे आहेत ते कीटक, जलवनस्पती, मारो उद्यणि सूक्ष्म जीवांचे संतुलन राखतात त्यांच्या खाण्याने पाणथळ परिसंस्थेधी जैवविविधता टिकते त्यांची संख्या घटली तर भविष्यात मोठा पर्यावरणीय असंतुलन निर्माण होईल उदाहरणार्थ, कीटकांची संख्या वाढून आजार परारू शकतात किंवा जतयनरपती वाढून पाणी दूषित होऊ शकते. कळंबा तलाव संवर्धनाची गरज आहे शहराजवळच्या निसर्गरम्य असणारा असा हा कळंबा तलावचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

कळंबा आमपंचायत आणि महानगरपालिकेने तलावातील सांडपाणी थांबवणे, कचरा व्यपस्थापन सुधारणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे अनधिकृत बांधकामे आणि विसर्जनावर कहक नियंत्रण आणाये नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा-महाषिद्यालयांत पक्षी निरीक्षण मोहिमा राबवाव्यात.. नियमित पक्षी गणना आणि अभ्यास उपक्रम चालू ठेवावेत.

Advertisement
Tags :

.