For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Koyna Dam | कोयना जलाशयात 'गुलाबी' पाहुण्यांची एन्ट्री! मुनावळे परिसरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्लेमिंगो दाखल

02:24 PM Jun 08, 2026 IST | NEETA POTDAR
koyna dam   कोयना जलाशयात  गुलाबी  पाहुण्यांची एन्ट्री  मुनावळे परिसरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्लेमिंगो दाखल
Advertisement

Advertisement

कास -स्थलांतरित पक्ष्यांमध्ये विशेष आकर्षण असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्लेमिंगो पक्षी (रोहित पक्षी) कोयना जलाशयातील मुनावळे परिसरात दाखल झाले असून, त्यांच्या आगमनामुळे पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुनावळे परिसरातील जलाशयाच्या उथळ भागात फ्लेमिंगोंचा थवा विसावलेला पाहायला मिळत आहे. लांब पाय, वाकडी चोच आणि गुलाबी-पांढऱ्या रंगाच्या आकर्षक पिसांमुळे हे पक्षी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जलाशयातील सुरक्षित अधिवास, मुबलक खाद्य आणि शांत वातावरणामुळे या स्थलांतरित पक्ष्यांनी कोयना जलाशयाची निवड केल्याचे जाणकारांचे मत आहे.

Advertisement

दरवर्षी विविध देशांमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी भारतातील जलक्षेत्रांमध्ये दाखल होतात. यंदा मुनावळे परिसरात त्यांचे दर्शन झाल्याने कोयना परिसराच्या जैवविविधतेत भर पडली आहे. स्थानिक नागरिक आणि छायाचित्रकारांकडून फ्लेमिंगोंचे छायाचित्रण सुरू असून, त्यांच्या उपस्थितीमुळे पक्षीनिरीक्षण पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, या दुर्मिळ पाहुण्या पक्ष्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखावे, मोठ्या आवाजाचा वापर टाळावा आणि परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन वन्यजीव अभ्यासकांनी केले आहे.

कोयना जलाशयात फ्लेमिंगो पक्ष्यांचे झालेले आगमन हे परिसरातील समृद्ध पर्यावरणाचे द्योतक मानले जात असून, निसर्गप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरत आहे

Advertisement
Tags :

.