नितेश सदानंद परब यांच्या खूनप्रकरणी तिघांना अटक
पेडणे (प्रतिनिधी)
वर्णावाडा मोरजी येथील नितेश सदानंद परब या 38 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी संशयित म्हणून संजय कोले, लक्ष्मी सावंत, प्रजय कोले व इतराविऊद्ध मांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
नितेश सदानंद परब या 38 वर्षीय नागरिकाला मंगळवारी जमावाने जबर मारहाण केली होती. त्यात संजय कोले, लक्ष्मी सावंत, प्रजय कोले व इतरांविऊद्ध मांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.
मंगळवारी जबरदस्त मारहाण केल्यानंतर परब याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. चार दिवसानंतर काल शुक्रवारी त्याचा मृत्यू झाल्यामुळे मांद्रे पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला आहे.
नितेश सदानंद परब याचे काही प्रमाणात मानसिक संतुलन बिघडल्याचे बोलले जात होते. तो वाड्यावर अनेकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी होत्या. नरकासुर करत असताना त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा त्याने प्रयत्न केला होता. त्यानंतर काही जमावाने त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. उपचार चालू असताना त्याला मृत्यू आला. त्यानंतर मांद्रे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला. मांद्रे पोलिसांनी तिघांनीही अटक केली. पुढील तपास मांद्रे पोलिस निरीक्षक जॅकीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.