महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गलिच्छ भाषेत संदेश देणाऱ्यास अटक

06:23 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/बलिया

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि गलिच्छ भाषेत टिप्पणी करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. मोहम्मद असीफ असे अटक झालेल्याचे नाव आहे. निखील गुप्ता नामक व्यक्तीने त्याच्याविरोधात अशी टिप्पणी केल्याची तक्रार केली होती.

Advertisement

असीफ याच्या विरोधात भारतीय दंड विधान अनुच्छेद 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 1 जून या दिवशी उत्तर प्रदेशातील बलिया मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत असताना, मोहम्मद असीफ याने गुप्ता याला फोन केला. फोनवरुन त्याने पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली. तसेच फोन बंद करु नकोस अशी धमकी आपल्याला दिली असे गुप्ता यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे. फोन बंद केल्यास तुझी हत्या केली जाईल, असेही असीफ याने धमकाविल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच असीफ याने गुप्ता यांच्याशी फोनवरुन झालेला संवाद ध्वनिमुद्रित केला आणि तो सोशल मिडियावरुन प्रसिद्ध केला, असेही गुप्ता यांनी तक्रारीत स्पष्ट केल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article