आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना अटक करा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी
त. भा. प्रतिनिधी
पणजी : नीट परीक्षेचा पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यानी पेलेले आंदोलन रास्त होते. मात्र त्या आंदोलनाच्या पडद्याआड राहून देश विरोधी कारवाई तसेच गढूळ राजकारण करू पहाणाऱ्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) निषेध करीत आहे, असे यश कंठक यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून देशभर जे सुऊ होते ते विद्यार्थ्यांचे आंदोलन नव्हे, तर युवकांना देशाविरोधात भडकावण्याचा संतापजनक प्रकार होता. पणजीत झालेल्या जल्लोषात मोहमद शाईन या युवकाने उमर खलिदला मुक्त करा असा फलक दाखवल्याने पणजी पोलिसांनी त्याला अटक केली आहे, अशा युवकांवर कठोर करवाई करण्याची मागणीही अभाविपने केली आहे.
आझाद मैदानावर जल्लोषादरम्यान घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी अभाविपने काल रविवारी निषेधसभा आयोजित केली होती. यावेळी कंठक बोलत होता. यावेळी त्यांच्यासोबत अत्रे भिडे, विरोज देसाई, शरद राणे, करीना शिरोडकर व अन्य कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
नीटप्रकरणी पहिले आंदोलन अभाविपनेच केले
आंदोलनाच्या नावाखाली देशाचा अपमान करणारे प्रश्न आंदोलनाच्या दरम्यान उपस्थित करण्यात आले. श्रीरामांच्या बाबतही असभ्य विधाने करण्यात आली. देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांचे समर्थन करून देशातील युवकांना देशाविरोधात भडकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रकार दिसून आले. पेपर फुटी विरोधात पहिले आंदोलन अभाविपने सुऊ केले हाते. त्याचा कुठे गाजावाजा करण्यात आला नाही, कारण ते आंदोलन विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होते, असेही त्यांनी सांगितले.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून येथील आझाद मैदानावर मेणबत्ती आंदोलन करण्यात आले. त्यावेळी काही युवक आझाद मादानावरील पवित्र स्मारकावर बसून सिगारेट ओढत असल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे, असेही त्यांनी सांगितले.
मोहम्मद शाहीनला अटक
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ‘सीजेपी’च्या कार्यकर्त्यांनी देशभर जल्लोष केला. त्याच जल्लोषाचा भाग म्हणून पणजीतील एका कार्यक्रमात मोहमद शाईन या युवकाने ‘उमर खालिदला मुक्त करा’ असा फलक दाखवल्याने मोठा गदारोळ उडाला. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे.