महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नंदगड येथील विद्यार्थी-प्रवाशांसाठी दोन बस फेऱ्यांची व्यवस्था

10:35 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आगारप्रमुखांचे आश्वासन : बसफेरीची सोय झाल्याने आजचा रास्तारोको मागे

Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

नंदगड-खानापूर रस्त्यावर बस वाहतूक वेळेवर नसल्याने सकाळच्या सत्रात शाळा महाविद्यालयांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत चार महिन्यांपासून खानापूर आगारप्रमुखांना अर्ज विनंती करून देखील नंदगड-खानापूर रस्त्यावर बस सुविधा उपलब्ध केलेली नव्हती. त्यामुळे नंदगड, बिडी, बेकवाड, हलशी भागातून शाळा, महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. वैतागलेल्या विद्यार्थी व प्रवाशांनी बुधवार दि. 6 रोजी ग्रा. पं. सदस्य प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोकोचा निर्धार केला होता. याची माहिती आगारप्रमुखांना देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवार दि. 5 रोजी बस आगारप्रमुख महेश तिरकन्नावर यांनी ग्रा. पं. सदस्य प्रवीण पाटील यांना आगार कार्यालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. येत्या चार-पाच दिवसात नंदगड-खानापूर-बेळगाव दरम्यान दोन बस फेऱ्यांची व्यवस्था करण्याचे आश्वासन आगार प्रमुखांकडून शिष्टमंडळाला देण्यात आले. शिष्टमंडळात आप्पाजी पाटील, फोंडू कुकडोळकरसह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. सकाळी 8 वा. नंदगडहून पहिल्या बस फेरीला सुऊवात होईल. सव्वा आठ वाजता बस खानापूरला येणार आहे. त्यानंतर खानापूर आगारातून साडेआठ वा. सदर बस नंदगडकडे निघणार आहे. दुसऱ्या फेरीत नंदगडहून 9 वा. बस सुटणार असून ती खानापूरमार्गे बेळगावला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.

आजचा रस्ता रोको रद्द

नंदगडहून नव्याने बसच्या फेरीला सुऊवात होणार असल्याने बुधवार दि. 6 रोजी नंदगड येथे करण्यात येणारा रस्ता रोको रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रा. पं. सदस्य प्रवीण पाटील दिली आहे. बस फेरीला सुऊवात होणार असल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article