For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पक्ष्यांना कृत्रिम पाणवठ्याची व्यवस्था

10:52 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
पक्ष्यांना कृत्रिम पाणवठ्याची व्यवस्था
Advertisement

सामाजिक संघटनांचा पुढाकार : व्हॅक्सिन डेपोत पाण्याची सोय

Advertisement

बेळगाव : हळुहळू थंडी ओसरून उष्णता वाढू लागली आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांचे पाण्याविना हाल होऊ नयेत यासाठी सामाजिक संघटनांकडून कृत्रिम पाणवठा निर्माण करण्यात आला आहे. व्हॅक्सिन डेपोमध्ये टाकाऊ बॉटलपासून पाच ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाबद्दल पक्षीप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे. जंगलतोड आणि इंटरनेटमुळे पक्ष्यांची संख्या घटली आहे. आपल्या आजुबाजुला दिसणारे पक्षीही दुर्मीळ होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज पक्षीप्रेमींतून व्यक्त होत आहे. पहाटे व रात्री थंडी असली तरी दिवसभर उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाण्याची गरज भासू लागली आहे. ही गरज ओळखून काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष्यांसाठी झाडांवर कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. त्यामुळे पक्ष्यांना पाणी उपलब्ध होणार आहे. शहराला लागून असलेल्या व्हॅक्सिन डेपो, रेसकोर्स परिसरात विविध पक्ष्यांचे वास्तव्य आहे. शिवाय हिवाळ्यात पाहुण्या पक्ष्यांचेही आगमन होते. मात्र, सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत पक्ष्यांना पाण्याची गरज भासू लागली आहे. प्रत्येकाने आपल्या अंगणात किंवा आजुबाजुला पक्ष्यांना पाणवठे किंवा ट्रे उपलब्ध करावेत, अशी मागणीही पर्यावरण प्रेमींतून होऊ लागली आहे.

...अन्यथा, दुर्मीळ पक्षीही लुप्त

Advertisement

विविध कारणांनी पक्ष्यांची संख्या घटू लागली आहे. हिवाळा कमी होऊन उन्हाचा पारा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या घराच्या आजुबाजुला पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा दुर्मीळ दिसणारे चिमणी, कावळेदेखील भविष्यात लुप्त होणार आहेत.

- अमन उसुलकर, पक्षीप्रेमी

Advertisement
Tags :

.