For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तळवडे ते मळगाव दोन स्वतंत्र अतिरिक्त बसची व्यवस्था करा

03:19 PM Sep 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
तळवडे ते मळगाव दोन स्वतंत्र अतिरिक्त बसची व्यवस्था करा
Advertisement

मळगाव इंग्लिश स्कूलच्या वतीने वेंगुर्ला आगरप्रमुखांना निवेदन

Advertisement

न्हावेली /वार्ताहर
मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत कोनापाल, तळवडे, मातोंड, येथून एसटी बसने ये-जा करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तळवडे ते मळगाव अशा दोन स्वतंत्र अतिरिक्त बसची व्यवस्था करावी, अशी मागणी मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेच्या वतीने वेंगुर्ला आगारप्रमुख यांच्याकडे निवेदनातून केली.यावेळी माजी सभापती राजू परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर राऊळ, माजी मुख्याध्यापक वैजनाथ देवण, रामचंद्र केळुसकर, पालक-शिक्षक संघांचे सदस्य सिद्धेश तेंडोलकर, मळगाव इंग्लिश स्कूलचे पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, ओमप्रकाश तिवरेकर, सीताराम नाईक, सुभाष नाटेकर आदी उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की, मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव या विद्यालयामध्ये एकूण ४७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी ६० विद्यार्थी रेल्वेस्टेशन, कोनापाल, तळवडे, मातोंड, येथून एसटी बसने ये-जा करतात. शाळेची वेळ ही सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.१५ ते सायंकाळी ३.५५ तसेच शनिवारी सकाळी ७.५५ ते दुपारी १२.०० अशी आहे. परंतु सध्या उपलब्ध असलेली बससेवा अपुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही वेळा उशिरा बस येणे, गर्दीमुळे जागा न मिळणे, यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक तसेच शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि नियमित वेळेवर शाळेत पोहचण्यासाठी अतिरिक्त एसटी बसची सोय करण्यात यावी. शक्य असल्यास सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.१५ ते सायंकाळी ३.५५ तसेच शनिवारी सकाळी ७.५५ ते दुपारी १२.०० या वेळेत तळवडे ते मळगाव अशा दोन स्वतंत्र बसची व्यवस्था विद्यार्थ्यांना करून द्यावी. या विनंतीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.