For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंजनेयस्वामी मंदिर, प्रतीक्षा हॉटेलनजीक बस थांबविण्याची व्यवस्था करा

10:38 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंजनेयस्वामी मंदिर  प्रतीक्षा हॉटेलनजीक बस थांबविण्याची व्यवस्था करा
Advertisement

रामतीर्थनगर रहिवाशांची मागणी : परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन 

Advertisement

बेळगाव : रामतीर्थनगरातील कार्यसिद्धी अंजनेयस्वामी मंदिराजवळ व प्रतीक्षा हॉटेलनजीक  परिवहन महामंडळाच्या बस थांबविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रामतीर्थनगरातील रहिवाशांनी केली आहे. रहिवाशांनी माजी महापौर एन. बी. निर्वाणी यांच्या नेतृत्वात बुधवारी (दि. 31) परिवहन संस्थेच्या अधीक्षक विजयालक्ष्मी यांची भेट घेऊन निवेदन देण्याबरेबरच चर्चाही केली. 2012 मध्ये खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नामुळे उपरोक्त दोन्ही ठिकाणी जलद, विनाथांबा व सामान्य बसेस थांबविण्याचा आदेश परिवहनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधिताना दिला होता. पण, त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याची माहिती रामतीर्थनगर रहिवाशांनी विजयालक्ष्मी यांना दिली. माग़णीची पूर्तता न झाल्यास बस रोको आंदोलन करू, असा इशाराही दिला.

चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन

Advertisement

विजयालक्ष्मी यांनी निवेदनाचा स्वीकार करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी रामतीर्थनगरचे रहिवासी आनंद करलिंगण्णवर, सी. एस. बिडनाळ, सुरेश उरबिनट्टी, मंजुनाथ पाटील, एन. बी. हण्णीकेरी आदी उपस्थित हेते.

Advertisement
Tags :

.