सिंधुदुर्ग सुपरसिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धेचा अर्पित बांदेकर विजेता
कुडाळचा प्रशांत म्हात्रे उपविजेता ; सचिन वालावलकर मित्रमंडळातर्फे स्पर्धेचे आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व सचिन वालावलकर मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा २०२५ मध्ये सावंतवाडीचा अर्पित बांदेकर हा विजेता ठरला. तर कुडाळचा प्रशांत म्हात्रे उपविजेता ठरला. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागातील ६८ स्पर्धकांनी भाग घेतला होता.सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगर वाचनालय वेंगुर्ले संस्थेच्या सभागृहात सचिन वालावलकर मित्रमंडळाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सुपरसिक्स कॅरम स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हासमन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर यांचेहस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांत कॅरम असोसिएशनचे योगेश फणसळकर, वेंगुल्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, कॅरमचे राष्ट्रीय पंच आशिष बागकर, बॅ. खर्डेकर कॉलेजचे स्थानिक संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे, रोटरी क्लबचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष आनंद बोवलेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर, सचिन वालावलकर मित्रमंडळाचे पदाधिकारी अँड. मनिष सातार्डेकर, महिला शहर शिवसेना प्रमुख अँड. श्रद्धा बाविस्कर-परब, विद्यानिकेतन स्कूलचे शिक्षक नितीन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. येथील नगर वाचनालय वेंगुर्ले संस्थेच्या सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व सचिन वालावलकर मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा २०२५ मध्ये तृतीय क्रमांक सावंतवाडीचा समीर देऊलकर, चतुर्थ क्रमांक कणकवलीच्या गौतम यादव, पाचवा क्रमांक सावंतवाडीच्या रामा गावडे, सहावा क्रमांक वेंगुर्लेच्या ओंकार कुबल, सातवा क्रमांक सावंतवाडीच्या तजमुल मकानदार याने तर आठवा क्रमांक सावंतवाडीच्या रफिक शेख याने पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच आशिष बागकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक उमेश येरम यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांत सचिन वालावलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष परब, महिला शहर शिवसेना प्रमुख अँड. श्रद्धा बावीस्कर-परब, सामाजिक कार्यकर्ते अँड. मनिष सातार्डेकर, विद्यानिकेतन स्कूलचे शिक्षक नितीन कुलकर्णी, पिंटू कुडपकर, बाळा आरावंदेकर, वालावलकर मित्रमंडळाचे सदस्य सागर शिरसाठ, प्रशांत सावंत, जयेश गावडे, लवू गावडे, शैलेश केसरकर, संदेश रेडकर यासह सर्व सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेसाठी सचिन वालावलकर मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी हि स्पर्धा यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले. शेवटी मंडळाचे अध्यक्ष संतोष परब यांनी सर्वांचे आभार मानले.