आरोग्य भारती गोवाकडून दोडामार्गात योग शिबिर संपन्न
दोडामार्ग – वार्ताहर
आरोग्य भारती गोवा यांच्याकडून तालुक्यातील डॉक्टर्ससाठी योग शिबिराचे आयोजन येथील महालक्ष्मी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी आरोग्य भारती गोव्याचे डॉ. आदित्य बर्वे यांनी तालुक्यातील उपस्थित डॉक्टर्सकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. हे शिबिर सकाळी ८ ते ११ वाजता या वेळेत संपन्न झाले. डॉ. बर्वे यांनी योगासनांची परिपूर्ण माहिती देत प्रत्यक्षिकेही करून दाखवली.या शिबिरात डॉ. उमेश देसाई, डॉ. महेश पवार, डॉ. अमोल देसाई, डॉ. समीर गवस, डॉ. नंदकिशोर दळवी, डॉ. रामदास रेडकर, डॉ. कृष्णा कविटकर, डॉ. योजना मोरजकर, डॉ. मनाली पवार, डॉ. संदेश नांदोडकर, डॉ. दर्शना घोगळे, डॉ. केतकी गवस, डॉ. प्रियांका बर्वे, डॉ. श्वेता देसाई, डॉ. गौरी देसाई, डॉ. वंदना गुजांते यांसह संजय सावंत, संजय नाटेकर यांनीही सहभाग घेतला होता.
छाया – समीर ठाकूर